मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे वेळापत्रक 5 ऑक्टोबरपासून बदलणार आहे. या नवीन वेळापत्रकानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून अप आणि डाऊन 20 जलद लोकल दादरहून धावणार आहेत.
सीएसएमटी, दादर स्थानकावर प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी दादर ते सीएसएमटीपर्यंत 20 अप आणि डाऊन लोकल धावणार आहेत.
कोरोनाच्या कालावधीनंतर मध्य रेल्वेवरील लोकल प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गर्दीचा भार सर्वच लोकल फेऱ्यांवर पडत आहे. परिणामी, दररोज गर्दीतून प्रवास करावा लागतो. दादर, येथून प्रवासी सीएसएमटीला पोहोचतात आणि नंतर लोकलने कल्याणच्या दिशेने प्रवास करतात.
सीएसएमटीहून 254 जलद लोकल धावतात. यातील अनेक लोकल पुरेशा प्लॅटफॉर्मअभावी उशिराने धावतात. याशिवाय अनेक गाड्या सीएसएमटी-दादर दरम्यान सिग्नलमुळे बराच वेळ थांबतात. ही समस्या सोडवण्यासाठी दादरहून सीएसएमटीऐवजी 20 जलद लोकल धावणार आहेत.
यामुळे लोकलचा वक्तशीरपणा सुधारण्यास मदत होईल. यामुळे दादरमधील गर्दी कमी होण्यासही मदत होईल, असा विश्वास रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला.
दादर स्टेशन हे मध्य रेल्वेच्या सर्वात व्यस्त स्थानकांपैकी एक आहे. दादर स्थानकावरून तीन लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.
नवीन वेळापत्रक 5 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातून 10 अप आणि 10 डाऊन लोकल धावणार आहेत. या बदलामुळे सध्याचा लोकलचा विलंब टळणार आहे.
एकूण लोकल फेऱ्या – 1,810 फेऱ्या
एकूण जलद लोकल – मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर 270 फेऱ्या
यातील 15 डबे जलद लोकल – 22 फेऱ्या.
यातील 12 डबे जलद लोकल – 248 फेऱ्या