[ad_1]
भारतात सध्या सणासुदीचा हंगाम सुरूय. आज, गुरुवारपासून नवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतोय. त्यानंतर दसरा आणि नंतर दिवाळी. अशा या सणासुदीच्या हंगामात विविध गॅझेट कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑफर्सचा धमाका लावलाय. नुकत्याच लॉंच झालेल्या iPhone16 या स्मार्टफोनसाठी तर पहिल्या दिवशी ग्राहकांच्या उड्या पडल्या होत्या. आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स डिजिटलने iPhone 16 खरेदीदारांसाठी खुशखबर आणलीय. रिलायन्स डिजिटलने iPhone 16 फोन खरेदीदारांसाठी बंपर सूट जाहीर केली आहे. बँक डिस्काउंट आणि नो-कॉस्ट ईएमआयमुळे आयफोन खरेदीवर सूट मिळत असताना आता आता रिलायन्स डिजिटलने धमाकेदार ऑफर जाहीर केली आहे. रिलायन्स डिजिटलच्या स्टोरमधून खरेदीदाराने आयफोन १६ खरेदी केल्यास त्याला पाच हजार रुपयांचे इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे.
[ad_2]
Source link