शाळकरी मुले समोर आल्यास सेल्फ ड्रायव्हिंग कार काय करेल?: चालकाला वाचवेल की एआयच्या मदतीने अल्गोरिदम निर्णय घेईल?

[ad_1]

  • Marathi News
  • International
  • What Would A Self driving Car Do If School Children Showed Up? Will The Driver Save Or AI assisted Algorithms Take The Decision?

न्यूयॉर्क3 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

अमेरिका आणि चीनमधील काही शहरांमध्ये एआयने सुसज्ज सेल्फ ड्रायव्हिंग वाहने धावू लागली आहेत. भारतातील काही कंपन्या त्यांची चाचणीही घेत आहेत. दरम्यान, एआयवर आधारित ‘थिंकिंग मशीन्स’च्या नैतिकतेबाबत वाद सुरू झाला आहे. सेल्फ ड्रायव्हिंग गाड्यांमुळे होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण, असा प्रश्न कायदेतज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ उपस्थित करत आहेत. अपघात झाल्यास सामान्य माणूस सर्वप्रथम ब्रेक लावतो. साहजिकच शक्य तितके जीव वाचवणे याला प्राधान्य असते. त्याच वेळी एआयसह सुसज्ज सेल्फ ड्रायव्हिंग कार अशा प्रकारे डिझाइन केल्यात की त्या सर्वप्रमथ रायडरचा जीव वाचवतात. यामुळे अशा स्थितीत प्रश्न पडतो की, समोर शाळेत पायी जाणारी मुले असतील तर कारचा निर्णय काय असेल?

हार्वर्ड बिझनेस स्कूलमधील बिझनेस एथिक्सचे प्रोफेसर जॉन शेड म्हणतात, ‘नैतिक निर्णय’ घेण्याचे अधिकार या मशीन्सनाच दिले जातील. सध्या काही कंपन्या नैतिक मूल्यांवर आधारित प्रोग्रामिंग निर्णय घेताहेत. उदा. अल्गोरिदम एआयच्या मदतीने अपघातात किती जणांचा समावेश आहे हे पाहून निर्णय घेऊ शकते. वास्तविक ही वाहने ‘ट्रॉली प्रॉब्लेम’च्या आधारे तयार केली जात आहेत. याची सुरुवात १९६० च्या दशकात ऑक्सफर्डच्या तत्त्ववेत्त्याने केली होती. याच्या आधारे अशा अपघातांच्या वेळी माणूस कसा निर्णय घेतो हे जाणून घेतले.

शैड म्हणतात की बहुतेक देशांची मागणी आहे की हे कारने स्थानिक मूल्यांवर आधारित निर्णय घ्यावेत. एलन मस्क आणि टेस्ला असा युक्तिवाद करते की सेल्फ-ड्रायव्हिंग कार अपघात टाळण्यात अधिक चांगल्या आहेत.

अपघातापेक्षा जास्तीत जास्त जीव वाचवणे गरजेचे

ऑटोमेशनमुळे रस्ते अपघात कमी होतील, असा कंपन्यांचा दावा आहे. मस्क यांनी टेस्ला इव्हेंटमध्ये युक्तिवाद केला होता की वाहनांतील ऑटोमेशनने मृत्यू कमी होतात. त्यामुळे त्याच्या अंमलबजावणीची आपली नैतिक जबाबदारी आहे. यातून होणाऱ्या मृत्यूंबद्दल तुमच्यावर खटला चालवला जात असला आणि अनेकांनी तुम्हाला दोष दिला तरीही. कारण अपघातात मृत्यू झाला किंवा कोणी जखमी झाल्यास त्याची आकडेवारी उपलब्ध आहे. परंतु वास्तव हे आहे की या तंत्रज्ञानामुळे आपण अधिक जीव वाचवत आहोत.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *