नववर्ष आणि नाताळच्या सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जाण्यासाठी गोवा, कोकणात किंवा दक्षिण भारतात केरळ आणि कर्नाटकात साजरा करण्याचे अनेकांचे नियोजन असते.
सलग सुट्ट्यांच्या कालावधीत होणारी गर्दी आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त रेल्वेगाड्या (special train) चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई (mumbai) ते करमाळी (karmali), कोच्चुवेली आणि पुणे (pune) ते करमाळी दरम्यान 48 विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच सीएसएमटी ते करमाळी या मार्गावर विशेष 34 रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक 01151 ही गाडी 20 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत सीएसएमटी येथून दररोज रात्री 12.20 वाजता सुटेल आणि करमाळी येथे त्याच दिवशी दुपारी 1.30 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 01152 ही गाडी 20 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत करमाळी येथून दररोज दुपारी 2.15 वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी रात्री 3.45 वाजता पोहोचेल.
या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम येथे थांबे असणार आहेत.
एलटीटी-कोचुवेली – एलटीटी मार्गावर 8 विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. गाडी क्रमांक 01463 विशेष एलटीटी येथून 19 डिसेंबर ते 9 जानेवारीपर्यंत दर गुरुवारी सायंकाळी 4 वाजता सुटेल. आणि कोच्चुवेली येथे दुसऱ्या दिवशी रात्री 10.45 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 01464 विशेष 21 डिसेंबर ते 11 जानेवारीपर्यंत दर शनिवारी कोच्चुवेली येथून सायंकाळी 4.20 वाजता सुटेल आणि एलटीटी येथे तिसऱ्या दिवशी 12.45 वाजता पोहोचेल.
या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मूकनबिका रोड, बाय कुंदापुरा, उडुपी, सुरतकल, ठोकूर, मंगळुरु जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर, थ्रिसूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलिकारा, कायनकुलम आणि कोल्लम येथे थांबे असतील.
गाडी क्रमांक 01408 विशेष रेल्वेगाडी 25 डिसेंबर ते 8 जानेवारीपर्यंत दर बुधवारी पहाटे 5.10 वाजता पुणे येथून सुटेल आणि करमाळी येथे त्याच दिवशी रात्री 8.25 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01408 विशेष रेल्वेगाडी 25 डिसेंबर ते 8 जानेवारीपर्यंत दर बुधवारी करमाळी येथून रात्री 10.20 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता पोहोचेल.
या रेल्वेगाडीला चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण (kalyan), पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि येथे थांबे असतील.
या रेल्वेचे आरक्षण विशेष शुल्कासह 14 डिसेंबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी या संकेतस्थळावर सुरू होईल, अशी माहिती मध्य आणि कोकण रेल्वेद्वारे दिली गेली आहे.
हेही वाचा