Blood Type Can Tell You About Your Health : गेल्या काही वर्षांमध्ये बदलेली जीवनशैली आणि कामाचा वाढता तणाव, जीवनाच्या प्रवासात पुढे राहण्याची स्पर्धेत अनेक जण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. अशात शरीराला गंभीर आजार वेढतात. पण एका संशोधनात असं सिद्ध झालंय की, तुमचा रक्त गट तुम्हाला भविष्यात कोणत्या आजाराचा धोका आहे, याचे संकेत देतो. तज्ज्ञ आणि संशोधक सांगतात की, विशिष्ट ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना कॅन्सरचा धोका असतो. (This blood group has the highest risk of cancer Blood Type Can Tell You About Your Health )
साधारणपणे 8 प्रकारचे ब्लड ग्रुप असून ज्यात A+, A-, B+, B-, O+, O-, AB+ किंवा AB- यांचा समावेश असतो. तुम्हाला तुमचा रक्तगट माहीत असायला हवा जेणेकरून तुम्हाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला मदत मिळते. रक्तगटाचा प्रकार कोणत्याही आजाराचा धोका असतो, ते जाणून घ्या.
अनेक संशोधनांमध्ये सांगण्यात आलंय, काही लोकांना मधुमेह, हृदयरोग किंवा कर्करोग यांसारख्या धोकादायक आजारांचा धोका जास्त असतो. तुमच्या रक्तगटावरून तुम्हाला कोणत्या रोगाचा धोका जास्त आहे. त्याचा धोका कसा कमी करता येईल ते समजून घ्या.
हृदयरोग
8 मुख्य रक्त प्रकारांपैकी, O रक्त गट असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका सर्वात कमी असतो. त्याशिवाय AB आणि B प्रकार असलेल्या लोकांना जास्त धोका असतो. डॉक्टर एबी आणि बी रक्तगट असलेल्या लोकांना हृदयासाठी निरोगी आहार आणि सवयींचे पालन करण्याचा सल्ला देतात.
कर्करोग
अभ्यासात असं आढळून आलंय की रक्तगट A किंवा AB असलेल्या लोकांना पोटाच्या कर्करोगाचा धोका सर्वाधिक असतो. तुमचा रक्तगट A, B किंवा AB असल्यास, तुम्हाला स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. जर तुम्ही या गटात येत असाल तर तुम्ही कॅन्सरशी लढा देणारे पदार्थ जास्त प्रमाणात खावे.
टेन्शन
A ब्लड ग्रुप असल्यास तुम्हाला तणावाचा सामना अधिक करावा लागतो. A प्रकार असलेल्या लोकांच्या शरीरात कॉर्टिसोल, एक तणाव संप्रेरक, पातळी वाढते. चिंता आणि तणाव कमी करण्यासाठी निरोगी आहार आणि व्यायाम यासारख्या उपायांकडे लक्ष द्या.
स्मरणशक्ती कमी होणे
तुमची स्मरणशक्ती कमकुवत असेल तर तुमचा रक्तगट AB असण्याची शक्यता आहे. एका अभ्यासात असं दिसून आलंय की, AB रक्तगट असलेल्या लोकांमध्ये स्मृती-संबंधित समस्या अधिक सामान्य असते.
मलेरिया
O रक्ताचा प्रकार या आजारावर मात करण्यास मदत करू शकतो. जेव्हा संक्रमित डास तुम्हाला चावतो तेव्हा तुम्हाला मलेरिया होऊ शकतो. त्याला कारणीभूत असलेल्या परजीवीला O रक्त असलेल्या लोकांशी जोडणे कठीण आहे.
अल्सर
पेप्टिक अल्सरला पोट अल्सर असेही म्हणतात. यामध्ये तुमच्या पोटाच्या किंवा आतड्याच्या वरच्या भागात जखमा निर्माण होतात, ज्यामुळे रुग्णाला खाणे-पिणे कठीण होते आणि वेदनाही होतात. ज्या लोकांचा रक्तगट O आहे त्यांना या आजाराचा धोका जास्त असतो.
संसर्गजन्य रोग
‘O’ रक्तगट असलेल्या लोकांना हेलिकोबॅक्टर पायलोरी संसर्ग होण्याची शक्यता जास्त होण्याची शक्यता आहे. या संसर्गामुळे पोट आणि लहान आतड्याला संसर्ग होण्याची भीती असते. अशा लोकांना कॉलरा, एस्चेरिचिया कोलाय आणि नोरोव्हायरसमुळे होणाऱ्या अधिक धोका असतो.
वंध्यत्व
अलीकडील संशोधन असं सांगतात की, ‘O’ रक्तगट असलेल्या महिलांना FSH, किंवा फॉलिकल-स्टिम्युलेटिंग हार्मोन (महिलांमध्ये ओव्हुलेशनसाठी जबाबदार असणारा हार्मोन) गर्भधारणा-संबंधित समस्या असू शकतात. त्यामुळे कमी अंडी तयार होतात. दुसरीकडे दुसऱ्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांना असे आढळून आलंय की, ‘बी’ रक्तगट असलेल्या महिलांमध्ये ‘ओ’ रक्तगट आणि ‘ए’ रक्तगट असलेल्या महिलांपेक्षा आयव्हीएफ यशस्वीतेचे प्रमाण जास्त असतं.
(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)