पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना लोकल प्रवास करण्यापूर्वी वेळापत्रक पाहावून प्रवास करावा लागणार आहे.
पश्चिम रेल्वेने काही निवडक लोकल सेवांच्या वेळेत आणि स्थानकांमध्ये बदल केले आहेत. सोमवारपासून म्हणजेच 16 डिसेंबरपासून केलेले बदल हे तात्पुरते असणार आहेत.
पश्चिम रेल्वेच्या काही लोकल गाड्यांच्या वेळेत आणि थांब्यांमध्ये तात्पुरते बदल करण्यात आले. यामध्ये अंधेरी-विरार लोकल (स. 6:49 वा.) भाईंदर इथपर्यंत धावेल. नालासोपारा लोकल भाईंदरहून धावेल. या दोन्ही लोकल प्रत्येकी १५ डब्यांच्या असणार आहेत. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या जलद धावतील.
पश्चिम रेल्वेनुसार लोकल ट्रेन क्रमांक 92019 अंधेरी-विरार (6:49)ही भाईंदरपर्यंत धावणार आहे. तर गाडी क्रमांक 90648 ही गाडी नालासोपारा येथून सुटण्याऐवजी दुपारी 4.24 वाजता भाईंदर स्थानकावरून सुटेल.
ट्रेन क्रमांक 90208 भाईंदर-चर्चगेट (सकाळी 8 वाजता) आणि 90249 चर्चगेट-नालासोपारा (सकाळी 9:30) ही लोकल 12 डब्यांच्या ऐवजी 15 डबे धावणार आहे. तसेच ही ट्रेन चर्चगेट ते मुंबई सेंट्रल फास्ट ट्रकवर धावेल.
यासंदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अलीकडेच आणखी एक एसी लोकल सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे 12 सामान्य सेवा काढून टाकाव्या लागल्या.
रेल्वेच्या या निर्णयाचा भाईंदरमध्ये निषेध करण्यात आला असून गेल्या अनेक दिवसांपासून प्रवासी स्वाक्षरी मोहीम राबवत आहेत. संतप्त प्रवाशांना शांत करण्यासाठी रेल्वेने हे बदल केल्याचे बोलले जात असून, त्यात भाईंदरवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
हेही वाचा
कोकण, गोव्यात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या