आरोग्य सुविधा ‘आपली चिकीत्सा’ पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. बीएमसी दवाखाने आणि रुग्णालयांमधील चाचणी सुविधा बंद केल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. पण पुन्हा ही सुविधा सुरू करण्यात आल्याचे फ्री प्रेस जर्नलने म्हटले आहे.
‘आपली चिकीत्सा’ ही सुविधा ‘आपला दवाखान्यात’ मोफत आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये परवडणाऱ्या दरात दिली जाते. मात्र आता 15 दिवसांत दुसऱ्यांदा ‘आपली चिकीत्सा’ थांबवण्यात आली होती.
3 डिसेंबर रोजी ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर बीएमसीने कृष्णा डायग्नोस्टिकला ही सेवा सुरू ठेवण्याची विनंती केली होती. कृष्णा डायग्नोस्टिकने 15 तारखेपर्यंत सेवा सुरू ठेवली. मात्र सोमवारपासून सेवा देण्यास नकार देण्यात आला होता.
पण यासाठी पुढील एजन्सी अंतिम होईपर्यंत कृष्णा डायग्नोस्टिक्स सेवा पुन्हा सुरू ठेवणार, असे कृष्णा डायग्नोस्टिक्सच्या सीईओ पल्लवी जैन यांनी सांगितले.
‘आपली चिकित्सा’ योजनेअंतर्गत 137 प्रकारच्या बेसिक आणि अॅडव्हान्स पॅथोलॉजी टेस्ट केल्या जातात. कृष्णा डायग्नोस्टिकद्वारे BMC दवाखाने, प्रसूतिगृहं, उपनगरीय रुग्णालयं, विशेष रुग्णालयं आणि वैद्यकीय महाविद्यालयांसह 400 हून अधिक केंद्रांवर वैद्यकीय सेवा पुरवते. त्यांच्याकडे दररोज सरासरी 4 हजार रुग्णांचे नमुने तपासणीसाठी येतात. ज्यामध्ये ते 35 ते 40 हजार वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करतात.
हेही वाचा
ठाणे जिल्हा रुग्णालयात झिका रुग्णांसाठी स्पेशल वॉर्ड