दिवसातून किती वेळा लघवी होणे सामान्य आहे? वारंवार लघुशंका होणे म्हणजे…


आपली लघवी हे आपण निरोगी आहे की नाही हे सांगतं. म्हणून रोगाचा निदान करण्यासाठी डॉक्टरही लघवीची चाचणी सांगतात. लघवीचा रंग आणि वास अनेक रोगाचे लक्षण सांगतात. पण दिवसांतून किती वेळा लघवीला जाणे नॉर्मल मानलं जातं. लघवी करणे हे तुम्ही दिवसभरात कोणते आणि किती पेये पितात यावर अवलंबून असतं. याशिवाय, कधीकधी लघवी शरीराचा आकार, हायड्रेशन पातळी, व्यायाम, वैद्यकीय स्थिती आणि दैनंदिन क्रियाकलाप यावर देखील अवलंबून असतो. पण वारंवार लघवी होणे हे देखील काही आजारांचे प्रारंभिक लक्षण असू शकतं, असे आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणंय. या लक्षणाची वेळीच काळजी घेतली नाही तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. (how many times a day should you pee Repeated urine person risk)

दिवसातून किती वेळा लघवी होणे सामान्य आहे?

या प्रश्नाबाबत आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, जर तुम्ही दिवसातून 3-3.5 लिटर पाणी प्यायले तर दर चार तासांनी लघवीला जाणे सामान्य आहे. याशिवाय, निरोगी व्यक्तीसाठी दिवसातून 5 ते 6 वेळा लघवी होणे सामान्य आहे. तर, 8 ते 10 वेळा लघवीला जाणे सामान्य नाही. म्हणजेच, जर तुम्हाला 8 वेळा लघवी करण्याची गरज भासत असेल तर ते शरीरातील अनेक आजारांचे लक्षण असू शकतात. 

कोणत्या रोगांची लक्षणे आहेत?

मधुमेह

वारंवार लघवी होणे हे मधुमेहाचे लक्षण मानलं जातं. जेव्हा तुम्हाला मधुमेह होतो तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते. अशा स्थितीत अतिरिक्त साखर काढून टाकण्यासाठी किडनीला अधिक मेहनत घ्यावी लागते. यामुळे, पीडिता जास्त लघवी करते आणि नेहमीपेक्षा जास्त वेळा बाथरूममध्ये त्यांना जावं लागतं. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही वारंवार लघवीची गरज भासत असेल, तर नक्कीच मधुमेहाची तपासणी करावी.

मूत्रपिंड संबंधित समस्या

वारंवार लघवी होणे हे मूत्रपिंडाशी संबंधित समस्यांचे लक्षण असू शकते. विशेषतः किडनीचे फिल्टर खराब झाल्यास लघवी करण्याची इच्छा वाढू शकते. अशा परिस्थितीतही चाचणी घेणे आवश्यक होते.

uti

यूटीआय अर्थात मूत्रमार्गात संसर्ग झाल्यास, एखाद्या व्यक्तीला वारंवार लघवी करण्याची गरज भासू शकते. तर लघवी करताना तीव्र जळजळ आणि खालच्या ओटीपोटात वेदना यांसारखी लक्षणे देखील दिसू शकतात.

मूत्राशय संबंधित समस्या

याशिवाय, वारंवार लघवी होणे हे देखील मूत्राशय संबंधित समस्यांचे लक्षण असू शकतं. अशा परिस्थितीतही आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला वेळेवर घेणे गरजेचे आहे.

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *