Donald Trump Warns India: अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदावर विराजमान होण्यापूर्वीच स्पष्ट केलं आहे की अमेरिका फर्स्ट हे धोरण त्यांच्यासाठी सर्वोतपरी आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेण्यापूर्वीच ट्रम्प यांनी भारतासोबतच चीनलाही इशारा दिला आहे. अलीकडेच त्यांनी भारतासह ब्रिक्स देशांवरील शुल्क वाढवण्याबाबत सांगितलं होतं. आता त्यांनी पुन्हा एकदा इशारा दिला असून, आता कराच्या बदल्यात कर लागेल, जेवढा ते आमच्यावर कर लावतील आम्हीही कर लावू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
‘तुम्ही जितका टॅक्स लावणार, तितकाच आम्हीही लावणार’
भारताने आमच्यावर कर लावला तर आम्ही भारतावरही समान कर लावू, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिला आहे. ते म्हणाले की, कर परस्पर आहे. जर त्यांनी आमच्यावर कर लावला तर आम्ही त्यांना समान कर लावू. “अमेरिकेच्या जवळपास सर्व वस्तूंवर मोठा कर लावला जातो, आणि आम्ही त्यांच्यावर कर लावत नाही, परंतु आता असं होणार नाही,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. चीनसोबतच्या संभाव्य व्यापार करारावरील प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, काही अमेरिकन उत्पादनांवर उच्च शुल्क लावणाऱ्या देशांपैकी भारत आणि ब्राझील हे देश आहेत.
ट्रम्प यांनी भारताला चेतावणी का दिली?
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की, भारत काही अमेरिकन उत्पादनांवर खूप जास्त शुल्क आकारतो. त्या बदल्यात त्यांनी पुन्हा एकदा भारतीय उत्पादनांवर समान उच्च शुल्क लादण्याची भाषा केली आहे. सर्वसामान्यपणे आपण पाहिलं आहे की, जर एखाद्याने आपल्यावर कर आकारला, तर त्याच्यावही तितकाच कर लावला जातो. जवळजवळ सर्व प्रकरणांमध्ये ते आमच्याकडून शुल्क आकारत आहेत, तर आम्ही त्यांच्याकडून शुल्क आकारत नाही असं ते म्हणाले आहेत.
चीनसोबतच्या संभाव्य व्यापार करारावरील प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही टिप्पणी केली. ट्रम्प म्हणाले की, भारत आणि ब्राझील हे देश काही अमेरिकन उत्पादनांवर खूप जास्त शुल्क आकारतात. पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, जर भारताने आमच्यावर 100 टक्के शुल्क आकारलं तर आम्हाला त्या बदल्यात काहीही घेणार नाही का?
तुम्हाला माहिती आहे, ते सायकल पाठवतात आणि आम्ही त्यांना सायकल पाठवतो. ते आमच्याकडून 100 आणि 200 टक्के शुल्क आकारतात. भारत खूप जास्त शुल्क आकारतो. ब्राझील देखील खूप जास्त शुल्क आकारतो. जर त्यांना आमच्याकडून शुल्क आकारायचे असेल तर ते ठीक आहे, परंतु आम्ही त्यांच्याकडून अशा प्रकारे अधिक शुल्क घेऊ. तुम्ही आमच्याशी जशी वागणूक दिली तशीच वागणूक मिळावी अशी अपेक्षा ठेवा असंही सांगण्यात आलं आहे.