New PAN Card: केंद्रीय मंत्रिमंडळाने १ हजार ४३५ कोटी रुपयांच्या पॅन २.० प्रकल्पाला मंजुरी दिली. सर्व पॅन कार्डधारक आपोआप पॅन २.० अपग्रेडसाठी पात्र आहेत. डायनॅमिक क्यूआर कोड आणि दुरुस्ती आणि आधार-पॅन लिंकिंगसारख्या पॅनशी संबंधित सर्व सेवांसाठी एक केंद्रीकृत पोर्टल तयार करण्यात आले आहे. दरम्यान, पॅन २.० कार्ड कसे मिळवायचे, त्याचे फायदे काय आहेत आणि जुन्या पॅनकार्डच्या तुलनेत किती सुरक्षित आहेत? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात.