मुंबईतील समुद्रामध्ये नौदलाच्या स्पीड बोटीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीला धडक दिल्याने 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
दुर्घटने प्रकरणी नेव्हीच्या पेट्रोलिंग स्पीड बोटीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पीड बोटवरील चालक आणि संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. ज्या व्यक्तीने बोट धडकली तो व्हिडीओ काढला त्याच व्यक्तीची FRI नोंदवून घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतांमध्ये 2 बालकांचाही समावेश आहे. या अपघातानंतर बेपत्ता असलेल्या दोन प्रवाशांचा शोध दुसऱ्या दिवशीही सुरू आहे.
गुन्हा दाखल
मुंबई जवळील एलिफंटा येथे जाणाऱ्या निलकमल प्रवासी बोट दुर्घटना प्रकरणी नेव्हीच्या पेट्रोलिंग स्पीड बोटीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ज्या व्यक्तीने बोट धडकल्याचा व्हिडीओ शूट केला त्यांच्याच तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाथाराम चौधरी असं या प्रवाशांचे नाव आहे.
स्पीड बोटवरील चालक आणि संबंधितांवर गुन्हा दाखल झालाय. दरम्यान ती नेव्ही स्पीड बोट नेव्हीने टो करून नेली असून पोलिसांकडून त्या बोटीची पाहणी आणि तपासणी करण्यात येणार आहे.
नौदलाच्या स्पीड बोट विरोधात नीलकमल बोट दुर्घटनेसंदर्भात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये सीआर क्र 283/24 अन्वये 106(1), 125 (अ) (ब), 282, 324 (3)(5) BNS नुसार एफआयआर नोंदवण्यात आला असून स्पीड बोट चालक आणि जबाबदार इतरांवर सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या स्पीड बोटचा अपघात झाला तिचं इंजिन नव्यानेच बसवण्यात आलं होतं. या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे. नेमकं या बोटीसंदर्भात काय घडलं? तांत्रिक अडचण का आणि कशी निर्माण झाली याबद्दलचा शोध घेण्यासाठी सविस्तर, सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
प्रथम दर्शनी हा अपघात नव्याने बसवलेल्या इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळेच झाल्याचं सांगितलं जात आहे. या बोटीचं नियंत्रण कोणाच्या हाती होतं याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या बोटीवर नौदलाचे दोन अधिकारी आणि त्यांच्यासोबतीने इतर चार सहकारी होते. पण अपघात झाला तेव्हा बोट कोण चालवत होतं याबद्दलची माहिती समोर येत आहे.
अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
चालकाचं बोटीवरील नियंत्रण सुटलं का? यासंदर्भातील तपासही नौदलाने सुरू केला आहे. निलकमल बोटीला या स्पीड बोटने धडक दिली तेव्हा ही बोट गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटा गुहांच्या दिशेने जात होती. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी नौदल्याच्या स्पीट बोटीवर असलेल्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा