बुधवारी गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) इथून एलिफंटा (Elephanta) च्या दिशेनं निघालेल्या नीलकमल नावाटच्या बोटीला उरणजवळील (Uran) करंजा (Karanja) इथं अपघात झाला.
नौदलाच्या पेट्रोलिंग स्पीड बोटनं धडक दिल्यामुळं ही पर्यटकांना नेणारी बोट बुडाली. या भीषण दुर्घटनेनंतर ती स्पीड बोट नौदलानं टो करून नेली असून पोलिसांकडून त्या बोटीची पाहणी आणि तपासणी करण्यात येत आहे.
उपलब्ध माहितीनुसार नेव्ही स्पीड बोटमध्ये एकूण सहा जण असून त्यातील तिघे मृत असून 1 जण गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13 वर पोहोचला आहे. 2 जखमी, 2 बेपत्ता असून एकूण 90 हुन जास्त जणांवर विविध रुग्णालयात उपचार करण्यात येऊन त्यांना सोडण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
एलिफंटा बोट दुर्घटनेतील मृतांची नावं
- महेंद्रसिंग शेखावत ( नेव्ही)
- प्रवीण शर्मा (NAD बोट वरील कामगार)
- मंगेश(NAD बोट वरील कामगार)
- मोहम्मद रेहान कुरेशी (प्रवासी बोट)
- राकेश नानाजी अहिरे( प्रवासी बोट)
- साफियाना पठाण मयत महिला
- माही पावरा मयत मुलगी वय-३ तीन
- अक्षता राकेश अहिरे
- मिथु राकेश अहिरे वय- ८ वर्षे
- दिपक व्ही.
- अनोळखी मयत महिला
- अनोळखी मयत महिला
- अनोळखी पुरुष
या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन दिले. यात त्यांनी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. तसेच प्रत्येकाच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली.
नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या स्पीड बोटचा अपघात झाला तिचं इंजिन नव्यानेच बसवण्यात आलं होतं. या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे. नेमकं या बोटीसंदर्भात काय घडलं? तांत्रिक अडचण का आणि कशी निर्माण झाली याबद्दलचा शोध घेण्यासाठी सविस्तर, सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
प्रथम दर्शनी हा अपघात नव्याने बसवलेल्या इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळेच झाल्याचं सांगितलं जात आहे. या बोटीचं नियंत्रण कोणाच्या हाती होतं याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या बोटीवर नौदलाचे दोन अधिकारी आणि त्यांच्यासोबतीने इतर चार सहकारी होते. पण अपघात झाला तेव्हा बोट कोण चालवत होतं याबद्दलची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा