Pushpa 2 The Rule OTT Release Update : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा २ द रूल’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २’ हा चित्रपट ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटात अल्लू आणि रश्मिका मंदानाची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आग लावत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकत धुमाकूळ घातला आहे. अशातच आता ‘पुष्पा २’च्या ओटीटी रिलीजसंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. ‘पुष्पा २’ पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी २०२५मध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती यापूर्वी देण्यात आली होती. दरम्यान, आता खुद्द ‘पुष्पा २’च्या प्रॉडक्शन हाऊसनेच या चर्चेमागचे सत्य सांगितले आहे.