बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आपल्या कुटुंबावर किती प्रेम करतो हे सर्वांनाच माहित आहे. शाहरुख खानने अनेकदा आपली तीन मुलं आणि पत्नी गौरी खानवर असलेले प्रेम कायम व्यक्त केले आहे. तो सार्वजनिक ठिकाणी सुहाना आणि अबरामची विशेष काळजी घेताना देखील दिसतो. आता शाहरुख खानच्या फोनचा वॉलपेपर व्हायरल होत आहे. हा वॉलपेपर पाहून शाहरुख खानचे चाहते पुन्हा एकदा त्याच्यावर फिदा झाले आहेत. शाहरुखच्या वॉलपेपरवर सुहाना किंवा गौरी खानचा फोटो नसून या खास व्यक्तीचा फोटो आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल ही खास व्यक्ती आहे तरी कोण?