Kuwait : 36 हजार कमवलात तर करोडपती व्हाल, जगातील सर्वात महागडे चलन


Most Expensive Currency:  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुवेत दौऱ्यावर आहेत. तब्बल 43 वर्षानंतर भारतीय PM  या पावरफुल देशाचा दौरा करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे कुवेत देश चर्चेत आला आहे. जगातील सर्वात महागडे चलन कुवेत देशात आहे. याच्या समोर डॉलरआणि पाऊंड देखील फिके पडतात. कुवेत मध्ये तुम्ही 36231 कमवत असाल तर याचे भारतीय रुपयांमध्ये यांची किंमत एक कोटी रुपये होते.  

जगाच्या कानाकोपऱ्यातील अनेक देशांमधील लोक कुवेत मध्ये नोकरीसाठी जातात. यामध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. कारण, कुवेत देशाचे चलन असलेल्या दिनारचे मुल्य भारतात 250 रुपयांपेक्षा जास्त आहे. यामुळे कुवेतमध्ये नोकरी करणारे भारतीय नागरिक महिन्याला लाखो रुपये पगार घेतात.

अमेरिका हा देश महासत्ता म्हणून ओळखला जातो.  यामुळे जगभरात अमेरिकन चलन असलेल्या डॉलर (Dollar) चा मोठा दबदबा आहे. तर, याच डॉलरला टक्कर देते ते इंग्लंडचे पाऊंड हे चलन. मात्र, कुवेतच्या दिनार पुढे डॉलरआणि पाऊंड यांचे मूल्य काहीच नाही. 

जगातील सर्वात महागडे चलन (Expensive Currency) युरोप अथवा अमेरिका खंडातील नाही. डॉलर आणि पाऊंड नाही तर कुवेतच्या दिनार आहे. कुवेतचे 1 दिनार खरेदी करण्यासाठी भारतीय नागरिकाला जवळपास 250 रुपयांपेक्षा अधिक मूल्य द्यावे लगाते. तर, डॉवरच्या मूल्यात हिशेब केल्यास 3.25 डॉलर खर्च करावे लागतात. दिनारचे मूल्य हे वेळोवेळी बदलत असते. कुवेतच्या 1 दिनारचे सध्या भारतीय रुपयांमध्ये मूल्य हे 275 रुपये इतके आहे.  

कुवेत कच्चे तेल निर्यात करणारा देश आहे. या देशाची जवळपास अर्धी जीडीपी तेलावर आधारीत आहे. तेलाच्या उत्पादनामुळे कुवेत आर्थिकदृष्ट्या खूप संपन्न आणि स्थिर आहे. तेलाचे साठे आणि करमुक्त प्रणालीमुळे कुवेती दिनार हे जगातील सर्वात मौल्यवान चलन ठरते. 

जगातील दहा मौल्यवान चलनांच्या यादीत अनुक्रमे कुवैती दिनार, बहरीनी दिनार, ओमानचे ओमानी रियाल, जॉर्डन दिनार, ब्रिटीश पौंड, जिब्राल्टर पौंड, केमन आयलंड डॉलर, स्विस फ्रँक हे स्वित्झर्लंड आणि लिकटेंस्टीनचे चलन आहेत. असे असले तरी डॉलर हे जागतिक स्तरावर सर्वाधिक स्वीकारले जाणारे चलन आहे.  जगातील सर्वात मौल्यवान चलनांच्या यादीत डॉलर 10 व्या स्थानावर आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *