CID Season 2 New Episode : प्रेक्षकांचा आवडता शो ‘सीआयडी’ पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतला आहे. या शोचा दुसरा सीझन नुकताच सुरू झाला आहे. हा प्रसिद्ध क्राईम बेस्ड शो लोकांना इतका आवडला होता की, त्याने २० वर्षे लोकांच्या हृदयावर राज्य केले. हा शो १९९८मध्ये सुरू झाला होता आणि बराच काळ प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय राहिला होता. या मालिकेचा शेवटचा भाग २०१८ मध्ये आला होता, त्यानंतर आता ६ वर्षांनी या मालिकेने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर शानदार एन्ट्री केली आहे. पहिल्याच एपिसोडमध्ये दया आणि अभिजीतची एन्ट्री खूपच रोमांचक होती. पहिल्या एपिसोडमध्ये दयाच्या एका छोट्याशा चुकीमुळे अभिजीतच्या मुलीच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे दाखवण्यात आले होते.