Gadar 3 Latest Update : बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या ‘गदर २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली होती. या चित्रपटाला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला असून, आता प्रेक्षक या चित्रपटाच्या पुढच्या भागाची वाट पाहत आहेत. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाच्या उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर स्टारर ‘गदर ३’मध्ये कथा काय वळण घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्यास अजून बराच वेळ आहे, पण त्याआधी पुढच्या भागाचे अपडेट्स येऊ लागले आहेत. ‘गदर ३’मध्ये नाना पाटेकर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.