Allu Arjun On Pushpa 2 stampede : ‘पुष्पा २’चा अभिनेता अल्लू अर्जुनने संध्या थिएटरमध्ये घडलेल्या घटनेला अपघात म्हटले आहे. शनिवारी या प्रकरणाबाबत बोलताना अल्लू अर्जुन म्हणाला की, माझ्या चारित्र्याचे हनन केले जात आहे. ४ डिसेंबरच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना अल्लू अर्जुन म्हणाला की, ‘ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. हा पूर्णपणे अपघात आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या मुलाच्या प्रकृतीबाबत मी दर तासाला अपडेट घेत आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सगळं चांगलं आहे. खूप चुकीची माहिती दिली जात आहे, खोटे आरोप केले जात आहेत. मला कोणत्याही विभागाला किंवा राजकारण्याला दोष द्यायचा नाही. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत.’