Priyaka Chopra Struggle Days : ग्लोबल स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्राने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर, हॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला आहे. प्रियांका आतापर्यंत अनेक हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये झळकली आहे. २०००मध्ये ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकणाऱ्या प्रियांकाला बॉलिवूडमध्ये नशीब चमकावणं सोपं नव्हतं. तिच्या आयुष्यात एक काळ असा आला जेव्हा तिला मुंबई सोडून आपल्या घरी परतायचं होतं. यामागचं कारण होतं तिच्या नाकाची शस्त्रक्रिया. चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे तिला अनेक चित्रपटांतून काढून टाकण्यात आले होते. शिवाय तिला काम मिळणेही बंद झाले होते. या काळात ‘गदर’चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी प्रियांकाला साथ दिली होती.