‘दे मला एकच प्याला…’ सूरत-बँकॉक विमानात दारुचा महापूर; ४ तासात प्रवाशांनी ढोसली १५ लिटर दारू


Passengers Drink 15 Litres Alcohol in Surat to Bangkok flight Flight : एअर इंडिया एक्स्प्रेसने शुक्रवारी गुजरातमधील सुरत ते बँकॉकपर्यंतचे पहिली थेट विमानसेवा सुरू केली. या विमानसेवेला प्रवाशांनी मोठा प्रतिसाद दिला. ही फ्लाईट फुल्ल झाली होती. या विमान प्रवासात प्रवाशांनी विमानसेवेचा मनसोक्त आनंद लुटला. सूरत आणि बँकॉक या ४ तासांच्या प्रवासात प्रवाशांनी तब्बल १.८ लाख रुपयांची १५ लिटर दारू रिचवली. या सोबतच खास गुजराती पदार्थ खमण, ठेपला आणि चिवडा हे देखील चकणा म्हणून फस्त केले. या प्रवाशांना सर्व्ह करून मात्र, एयरहोस्टेसची पुरती दमछाक झाली. या प्रवासाचा अनुभव व व्हिडिओ काही प्रवाशांनी शेअर केला असून याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *