South Africa Famous Bread Girl: दक्षिण आफ्रिकेतील 5 वर्षांच्या एका मुलीला तिच्या सिंगल मदर असलेल्या आईने ब्रेड आणायला पाठवले. ब्रेड घेऊन घरी परत येत असताना एका व्यक्तीने तिचा फोटो काढला. हातात ब्रेड आणि तिच्या चेहऱ्यावरचे निखळ हास्य त्या फोटोत कैद झाले. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. सोशल मीडिया युजर्सने या फोटोला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. लोकांच्या मागणीमुळे त्या ब्रेडच्या कंपनीने या मुलीला ब्रँड अॅम्बॅसडर केले आणि तिचा हा फोटो आता दक्षिण आफ्रिकेत ब्रेडची जाहिरात करणाऱ्या होर्डिंग्जवर लागला असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. त्या बदल्यात आई-मुलीला दोन खोल्यांचे घर मिळाले आहे आणि या मुलीच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च कंपनी करणार आहे. तिचे हे निखळ हास्य बघून यूजर्स ब्रेड खरेदी करत असल्याचंही बोललं जात आहे.
नेमकं झालं काय?
फोटोग्राफर लुंगीसानी मजजी यांनी आपल्या भाचीचे हातात ब्रेड घेऊन हसतानाचा एक सुंदर फोटो काढला होता. जो गेल्या वर्षी व्हायरल झाला होता. त्यानंतरच्या लुंगीसानी मजजीने अल्बनीशी या कंपनीची कोणताही करार झाला नसल्याची कबुली देऊन सोशल मीडियावर या ब्रँडवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की मला किंवा मुलीला या फोटोच्या बदल्यात कंपनीकडून काहीच देण्यात आलेले नाही.
त्या मुलीला काहीतरी मिळेल आणि आपल्याला अल्बनी कंपनीसोबत काम करायला मिळेल अशा आशेने त्याने आपला काढलेला फोटो कंपनीला त्यांच्या सोशल मीडियावर रिपोस्ट करण्याची परवानगी दिली पण त्याला वाटलं तसं काहीच झालं नाही. त्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यावर यूजर्सच्या चागल्या कमेंटस् आल्या आणि त्या ब्रेड कंपनीची जाहिरातही झाली. त्याबदल्यात त्यांना काहीच मिळाले नाही असं लुंगीसानी मजजी यांनी सांगितलं आहे.
याचा कोणताही मोबदला मिळाला नाही
संडे वर्ल्ड च्या लेखात मजजी यांनी सांगितलं की, “मला असे म्हणायचे नाही की अल्बानी कंपनीने माझ्या भाचीचा किंवा माझ्या कामाचा उपयोग त्यांच्या फायद्यासाठी केला. पण त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे फोटो पुन्हा पोस्ट केले. हो खरे आहे की आमच्यात कोणताही करार झाला नव्हता. पण या कामाचे कौतुक म्हणून, विशेषतः त्या मुलीसाठी त्यांनी काही केल्यास खूप मदत झाली असती.”
मजजी सांगतात की अल्बनी कंपनीचे कर्मचारी त्यांच्या घरी आले होते, तेव्हा त्यांना वाटले की ते त्यांना काहीतरी भरपाई देईल. पण ते फक्त कर्मचारी होते ज्यांनी चांगल्या मनाने आम्हाला ब्रेडची पाकिटे, ब्लँकेट आणि गॅसचा स्टोव्ह दिला.” नंतर टायगर नावाच्या एका ब्रँड्स स्पष्ट केले की “त्यानंतर अल्बानी कंपनीच्या लोकांनी या कुटुंबाला भेट दिली आणि मजजीच्या आजीसाठी एक गॅस स्टोव्ह आणला होता. त्या मुलीसाठी आणि परिसरातील इतर मुलांसाठी ब्लँकेट्स, जेवणाचे डबे आणि हॅम्पर आणले होते. ही मुले अनेकदा त्याच्या कंपनीच्या फोटोग्राफी कॅम्पेनमध्ये मदत करतात”.
सोशल मीडियावर मात्र या मुलीच्या फोटोची चांगलीच चर्चा आहे. अनेक ठिकाणी ती कंपनीची ब्रँड अॅम्बॅसडर झाल्याचं सांगितलं जात आहे. तर काही युजर्स असं खरंच व्हावे यासाठी कंपनीकडे मागणी करत आहेत.