Man Who Lost Rs 5856175 Crore: सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेल्या बिल गेट्स, जेफ बेझॉस, मुकेश अंबानी, गौतम अंबानी आणि अशा अनेक अब्जाधिशांपेक्षाही तो फार श्रीमंत होता. एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या माणसाचं नाव आहे, मासायोसी सन! (Masayoshi Son) ‘फोर्ब्स’च्या श्रीमंताच्या यादीनुसार आज या व्यक्तीची एकूण संपत्ती 23 बिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. मुकेश अंबानींच्या 92 बिलियन अमेरिकी डॉलर्स आणि गौतम अदानींच्या 50 बिलियन अमेरिकी डॉलर्सपुढे ही संपत्ती काहीच नाही असं म्हणता येईल. पण मासायोसी सन हा आहे तरी कोण आणि त्याने 58 लाख 56 हजार 175 कोटी रुपये नेमके कुठे गमावले? चला तर जाणून घेऊयात…
ही व्यक्ती आहे तरी कोण?
आता मासायोसी सन हे नाव पहिल्यांदाच वाचलं असेल त्यांच्या या व्यक्तीची ओळख सांगायची झाली तर सॉफ्टबँक समुहाचे संस्थापक, अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अध्यक्ष आहेत. ही तीच कंपनी आहे जिने भारतामधील अनेक स्टार्टअपमध्ये सुरुवातीला गुंतवणूक केली आहे. ज्यामध्ये ओला, ओयो आणि पेटीएणसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. तसेच मासायोसी सन हे व्हिजन फंड्सचे मालक असून त्यांना अॅपल, क्वालकोम, फॉक्सकॉन, सेली एलिसनच्या गुंतवणुकीबरोबरच आणि सौदी अरेबियामधून अर्थसहाय्य मिळालं आहे.
अमेरिकेत शिक्षण अन् पहिली कंपनी…
मासायोसी सन यांचा जन्म जपानमधील असून त्याचे वडील बेकायदेशीर उद्योगांमध्ये होते. मात्र संपूर्ण शहरामध्ये पहिली कार खरेदी करणारं कुटुंब अशी त्यांची ओखळ होती. जपानमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर मासायोसी सन उच्च शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये दाखल जालं. त्यांनी 1980 मध्ये बार्कले या नामवंत विद्यापीठामधून बी.ए. इन इकनॉमिक्समधून पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी स्वत:ची व्हिडीओ गेम कंपनी सुरु केली. या कंपनीचं नाव होतं युनीसन वर्ल्ड! ही कंपनी नंतर त्यांनी 2 मिलियन अमेरिकी डॉलर्सला विकतील. त्या पैशांमधून मासायोसी सन यांनी 1981 साली सॉफ्टबँकची स्थापना केली.
5856175 कोटींवरुन…
मासायोसी सन हे अलिबाबा, याहू यासारख्या त्याकाळात इंटरनेट सुरु झाल्यानंतर सर्वात आधी नावारुपास आलेल्या कंपन्यांमध्ये प्रमुख गुंतवणूकदार होते. त्यामुळेच ते अल्पावधीत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले. मात्र शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाल्याचा फटका मासायोसी सन यांच्या कंपन्यांना बसला आणि त्यांची संपती 78 बिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 5856175 कोटी रुपयांवरुन 8 बिलियन अमेरिकी डॉलर्सवर आली. अनेक गुंतवणुकींमध्ये फटका बसल्यानंतरही मासायोसी सन हे जपानमधील श्रीमंतांच्या यादीत कायम राहिले. त्यांनी 2006 मध्ये व्होडाफोन जपान कंपनी ताब्यात घेतली. सध्या त्यांची एकूण संपत्ती 23 बिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार 1921 कोटी रुपये इतकी संपत्ती मासायोसी सन यांच्याकडे आहे.