Good News! पुरुषांनाही मिळणार 6 महिन्यांची भरपगारी Paternity Leave; ऐतिहासिक निर्णय


This Company Give Equal Paid Paternity Leave For Father: महिला गरोदर असताना आणि बाळ झाल्यानंतर बाळाच्या संगोपनासाठी कंपन्यांकडून दिली जाणारा मातृत्व रजा कायमच या ना त्या कारणाने चर्चेत असते. भारतामध्ये नुकत्याच एका प्रकरणात न्यायालयाने महिला खासगी कंपनीत असो किंवा सरकारी विभागात काम करणारी असो तिला 180 दिवसांची मातृत्व रजा मिळालीच पाहिजे, असं राजस्थान उच्च न्यायालयाने निकालात म्हटलं आहे. एकीकडे ही बातमी समोर येत असतानाच दुसरीकडे लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या ‘डेलॉइट’ या बहुराष्ट्रीय कंपनीने एक फारच आगळावेगळा निर्णय घेतला आहे.

बीग फोरपैकी ठरली पहिलीच कंपनी

‘डेलॉइट’ने युनायटेड किंग्डममधील कर्मचाऱ्यांना समसमान मातृत्व रजा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. म्हणजेच कंपनीचा कर्मचारी महिला असो अथवा पुरुष असो ते पालक झाल्यानंतर त्यांना सारख्याच दिवसांसाठी संगोपन रजा दिली जाणार आहे. जगभरातील अकाऊंटींग क्षेत्रातील चार मोठ्या कंपन्यांपैकी म्हणजेच बीग फोर अकाऊंटींग फर्मपैकी एक असलेल्या ‘डेलॉइट’ने महिलांइतकीच मातृत्व रजा पुरुषांना दिली जाईल अशी घोषणा केली असून ही रजा भरपगारी असणार आहे हे विशेष!

कंपनीने काय घोषणा केली?

कंपनीने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, पालक झाल्यानंतर महिला असो अथवा पुरुष सर्वांनाच 26 आठवड्यांची म्हणजेच सहा महिन्यांची भरपगारी सुट्टी दिली जाणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून हे नवीन धोरण लागू केलं जाणार आहे. या सुट्टीला ‘फॅमेली लिव्ह’ असं नाव देण्यात आलं आहे. यापूर्वी दिली जाणारी मातृत्व रजा केवळ 4 आठवड्यांची होती. 

हे सर्वेक्षण ठरलं कारणीभूत

‘युजीओव्ही’ने (YouGov) केलेल्या संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की कंपनी निवडताना कर्मचारी पालकत्वासाठी किती रजा दिली जाते याचा विचार करतात. पालकत्व रजेचा विचार करुन कंपनीमध्ये नोकरी करावी की नाही हे ठरवणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल 87 टक्के इतकी आहे. तर कंपनीमध्ये काम करावं की नोकरी बदलावी हे ठरवताना कंपनीकडून दिली जाणारी पालकत्व रजा महत्त्वाची ठरते असं म्हणणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 85 टक्के इतकी असल्याचं संशोधनामध्ये दिसून आलं.

आई झालेल्या महिलांची उत्तरं निर्णयासाठी ठरली महत्त्वाची

‘डेलॉइट’च्या माध्यमातून झालेल्या या संशोधनामध्ये पालकत्वाची जबाबदारी पार पाडताना मुलांच्या संगोपनासाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कालावधीमध्ये आई आणि वडिलांना असमान सुट्ट्या दिल्याचा वाईट परिमाण होतो असं दिसून आलं. या सर्वेक्षणामध्ये आई झालेल्या महिलांपैकी 54 टक्के महिलांनी त्यांच्या जोडीदारालाही अधिक पालकत्व रजा मिळाली तर मुलांच्या संगोपनामध्ये आणि करिअरमध्ये पुढे जाण्यास नक्कीच मदत होईल असं मत नोंदवलं आहे. या सर्वेक्षणामधील नवमांतांपैकी 61 टक्के महिलांनी ज्यांच्या जोडीदाराला अधिक सुट्टी मिळाल्यास त्याचा नक्कीच अधिक फायदा होईल असं म्हटलं आहे. 57 टक्के नवमातांनी आई झाल्यापासून आपण जोडादाराला फारशी सुट्टी नसल्याने कामाचे तास कमी केल्याचं सांगितलं.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *