विनोद राठोड, प्रतिनिधी मुंबई, 28 जुलै : ठाकरे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि काँग्रेसने ‘वज्रमूठ’ सभेतून चांगलंच वातावरण तापवलं होतं. त्यात कर्नाटक निवडणुकीतील विजयानंतर महाविकास आघाडीला पुन्हा बळ मिळालं होतं. अशात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांसोबत महाविकास आघाडीलाही धक्का बसला. या सभा पुन्हा सुरू होतील याविषयी प्रश्नचिन्ह होतं. परंतु, महाविकास आघाडीच्या थांबलेल्या ‘वज्रमूठ’ सभा आता पुन्हा होणार आहेत. ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा सुरू होणार? देशभरातील प्रमुख विरोधी पक्ष ‘इंडिया’च्या बैठकीनंतर राज्यभरात ठिकठिकाणी सभांच आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या सभांना शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह काही ठिकाणी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे देखील हजेरी लावणार आहे. ‘इंडिया’ची बैठक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झाल्यानंतर सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत आज पार पडलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. वाचा –
दुपारचं जेवण आणि तो विषय, रोहित पवार आणि अजित पवार यांच्या भेटीची INSIDE STORY ‘‘भविष्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि इतर घटक पक्ष बसून जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहोत. याशिवाय महाविकास आघाडीचे एकत्रित संघटन व महाराष्ट्राला सक्षमपणे ठाम पर्याय देण्याचा प्रयत्न आघाडीचा असणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) पुन्हा एकदा राज्यभरात सभा घेणार आहे. या सभांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करणार आहे. आघाडीमध्ये जागावाटपासून नेत्यांची वेगवेगळी वक्तव्य येत असताना पुन्हा एकदा सभा सुरु होणार आहेत. त्यामुळे आघाडीच्या कार्यकर्त्यांना काहीसा दिला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्या आघाडीला धक्का ठाकरे सरकार पायउतार झाल्यानंतर महाविकास आघाडीने भाजप विरोधात चांगले रान पेटवलं होतं. या सभांना लोकांचा चांगला प्रतिसादही मिळत होता. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने आघाडीला मोठा धक्का बसला. ही कमी भरुन काढण्यासाठी आता खुद्द शरद पवार मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :