पावसाळ्यात राहायचं फिट? तर झोपण्यापूर्वी हे पदार्थ खाणे टाळले पाहिजेत?


मुंबई, 28 जुलै : आजकाल पुरेशी झोप मिळवण्यासाठी प्रत्येकजण संघर्ष करत असल्याचे दिसते. जर तुम्हाला कुठलेही झोपेचे विकार नसतील तर तुम्हाला झोपेसाठी आणखीन आव्हानांची गरज नाही. चांगल्या झोपेसाठी निरोगी पोषण आणि रात्रीचे जेवण कसे असावे याचा देखील समाविष्ट होतो. पावसाळ्यात फिट राहण्यासाठी तुमच्या रात्रीच्या नित्यक्रमातून कोणत्या प्रकारचे पदार्थ काढून टाकले पाहिजेत किंवा कोणते पदार्थ रात्री खाल्ल्याने त्याचा शरीरावर काय परिणाम होऊ शकतो? याची सविस्तर माहिती मुंबईतील आहार तज्ज्ञ आरती भगत यांनी दिली आहे.   काय टाळावे? सर्वसाधारणपणे तुम्हाला पचायला कठीण असलेले पदार्थ, जास्त साखर किंवा मसाले असलेले पदार्थ आणि छातीत जळजळ वाढवणारे पदार्थ यांचा वापर कमी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आहारात कॅफेन असलेले पदार्थ म्हणजेच मद्य, कोल्ड्रिंक, कॉफी, चहा इत्यादी पदार्थ टाळणे अत्यावश्यक आहे. कॅफेन किंवा बाहेरील जंक फूड खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील झोप येणाऱ्या हार्मोन्सवर त्यांचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला झोप येत नाही. या पदार्थांच्या सेवन केल्यामुळे दुसऱ्या दिवशी डोकेदुखी, ऍसिडिटी आणि अशक्तपणा जाणवतो.

News18लोकमत


News18लोकमत

झोपण्यापूर्वी मद्यपान केल्यास सुरुवातीला झोप लागेल, परंतु त्याचा झोपण्याच्या हार्मोन्स वर परिणाम झाला असल्याकारणाने सतत जाग येत असते. त्याचप्रमाणे लघवी सतत येत असते. त्यामुळे डिहायड्रेशनचा शरीराला त्रास होतो. परिणामी आपले तोंड कोरडे पडते आणि सतत तहान लागते म्हणून शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी मद्यपान, कॅफेन आणि जंक फूड टाळणे आवश्यक आहे. पदार्थात साखरेचे जे पदार्थ असतात त्यामुळे शरीरातील ग्लुकोजच्या लेबलमध्ये वाढ होते. शरीरात ग्लुकोज लेवल वाढल्याने आपली एनर्जी जास्त असते आणि परिणामी आपल्याला झोप लागत नाही. त्यामुळे शक्यतो साखरेचे पदार्थ झोपण्यापूर्वी टाळणे आवश्यक आहे, असे आहार तज्ज्ञ आरती भगत यांनी सांगितले आहे.

…तर होईल चेहऱ्यावर परिणाम! ‘या’ ठिकाणी कधीच ठेवू नका मेकअपचं साहित्य

झोपण्यापूर्वी काय खावे? झोपण्यापूर्वी सहसा गरम दूध प्यावे. जेणेकरून शांत झोप लागते त्याचबरोबर दुधात इलायची आणि जायफळ घालून पिणे शरीर त्याचबरोबर चांगल्या झोपेसाठी उत्तम ठरते. झोपण्यापूर्वी दुधात बदाम, हळद, केसर असे पदार्थ खाल्ल्याने झोप येण्यास मदत होते आणि चांगली झोप झाली असल्यामुळे शरीर देखील निरोगी राहण्यास उपयुक्त ठरते, अशी माहिती आहार तज्ज्ञ आरती भगत यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *