[ad_1]
मुंबई, 27 जुलै : पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल झाल्या. यानंतर विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे आणि ठाकरे गटाचे आमदार यांच्या शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. आज ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यात तु तू मैं मै पाहायला मिळाली. याचं कारण होतं, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस. काय झालं परिषदेत? ठाकरे गटाचे आमदार अनिल परब म्हणाले, की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने आम्हाला लवकर जायचे आहे, याबाबत आम्ही विनंती केली होती. प्रविण दरेकर : असं कसं चालेल तुम्हाला जायचे असेल तर जावा. अनिल परब : अशी जर भुमिका असेल सत्ताधारी पक्षाची तर मग आमच्याकडून कोणत्याही सहकार्याची अपेक्षा करु नका. यावेळी (सत्ताधारी पक्षातील आमदार खाली बसून बोलले नको आम्हाला तुमचे सहकार्य) अनिल परब : मग आम्हाला बिलांवर बोलायचे आहे आणि जर मंजूर झाले नाही तर जबाबदारी आमची नाही. निलम गोऱ्हे : मंत्री सावे यांचे बील महत्वाचे आहे. याच्याबद्दल अहंकाराचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न कुणी करू नये. ज्यांना जायचे असेल त्यांनी जावे. उशीरा गेलात तरी चालेला ना? आम्हालाही माहितीये काही असा प्रश्न नाहीये. त्यांच्यावर जाहीर चर्चा करू नका. अनिल परब : आमची विनंती मान्य करता येणार नाही असं स्पष्ट करा मग. निलम गोऱ्हे : अनिल परब जेवलात ना? वाढदिवसाच्या दिवशी असं वागणं बरं दिसतं का? वाढदिवसाकरता जाणे गरजेचे आहे. पण ज्या करता तुम्ही या सभागृहात आलात तेही तुम्ही विसरू नका. 36 नंबरचे विधेयक होते ते, आता इथे 36चा आकडा होता होता राहिले, असा टोला गोऱ्हे यांनी लगावला. वाचा –
महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर ‘उद्योग रत्न’; पहिल्या पुरस्कार्थींच नाव समोर ठाकरे गटाचा नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापतीपदी राहण्यावरच आक्षेप विधानपरिषदेत विरोधी बाकांवरून नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापतीपदी राहण्यावरच आक्षेप घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे त्यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. मात्र, त्यावर नंतर बोलण्यास दिलं जाईल, असं म्हणत नीलम गोऱ्हेंनी चर्चेची परवानगी नाकारली. “अशा प्रकारे सभागृहाला वेठीस धरता येणार नाही”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनीही विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link