पाणी चोरी करणाऱ्यांवर ‘फ्लाइंग स्क्वॉड’ची नजर

[ad_1]

मुंबईला (mumbai) सध्या सात तलावांतून पाणी पुरवठा होत आहे. या तलावांच्या (lakes) एकूण क्षमतेच्या 99% पाणीसाठा मुंबईला होतो. असे असूनही, शहरातील अनेक भागात पाणीटंचाईची (water shortage) समस्या आहे. गेल्या महिनाभरात पाण्याच्या समस्यांबाबत महापालिकेकडे (bmc) सुमारे 2,427 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 

त्यामुळे, महापालिका आता पाण्याची होणारी गळती अथवा चोरी ओळखून ती दुरुस्त करणार आहे. तसेच अनधिकृत नळजोडणीवर आळा घालण्यासाठी फ्लाइंग स्क्वॉड तयार करणार आहे. याव्यतिरिक्त, पालिकेने असा इशारा दिला आहे की अनधिकृत मोटर पंप  (illegal motor pump) जप्त केले जातील. जर अनधिकृत गोष्टी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.

शहराला पुरवठा करणाऱ्या सात तलावांतील सध्याचा पाणीसाठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरेल इतका आहे. तथापि, प्रतीक्षा नगर सायन, सांताक्रूझ-कलिना, अंधेरी पूर्व, शिवेरी आणि वडाळा यासह अनेक भागात अजूनही पाणीटंचाई जाणवत आहे. 

महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. सोमवारी आमदार अमीन पटेल यांनी डोंगरी, झकेरिया मशीद स्ट्रीट, मेमन वाडा, गुजर गल्ली आणि मुंबादेवी भागातील पाणीटंचाई आणि अस्वच्छता या महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.

बेकायदेशीर मोटरपंप आणि अनधिकृत पाईप जोडण्यांवर कारवाई करण्यासाठी भूषण गगराणी यांनी तातडीने पालिका अधिकाऱ्यांना फ्लाइंग स्क्वॉड तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अलीकडे टी.जे. रोड, क्रिसेंट बे, जेरबाई वाडिया रोड, सेंच्युरी मिल म्हाडा कंपाऊंड, खार दांडा, वांद्रे (पूर्व), मालाड, दिंडोशी येथील क्रांतीनगर आणि बोरिवलीतील राजेंद्र नगर यासह विविध भागात पाण्याचा कमी दाब आढळून आला. स्थानिक वॉर्ड कार्यालयांनी तक्रारींचे तातडीने निराकरण केले आहे, असा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे.


हेही वाचा

Metro Connect 3 ॲपचे अनावरण, मात्र प्रवासी नाखूश

चेंबूरच्या आगीत माणुसकीही झाली खाक

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *