दक्षिण मुंबईत वाहतूक निर्बंध लागू, ‘हे’ रस्ते बंद

[ad_1]

उद्योगपती रतन टाटा यांचे पार्थिव आज (गुरुवार, १० ऑक्टोबर) नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. 

टाटांच्या कुलाबा निवासस्थानापासून सकाळी एनसीपीएपर्यंत आणि पुढे वरळीपर्यंतच्या शेवटच्या प्रवासापूर्वी दक्षिण मुंबईत वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मरीन ड्राईव्हचा रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केला जाईल. रतन टाटा यांच्यासाठी यावेळी पोलिसांनी वरळीपर्यंत ग्रीन कॉरिडॉरही तयार केला आहे.

गुरुवारी सकाळपासून नरिमन पॉईंट परिसरात कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.  ट्राफिक पोलिसांनी सांगितल्यानुसार, संपूर्ण मरिन ड्राइव्ह रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

ओबेरॉय हॉटेलजवळील एनसीपीएमधील पार्थिव दुपारी 4 नंतर वरळीला नेण्यात येईल.

भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर, बुधवारी रात्री उशिरा निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वातंत्र्यानंतर भारतीय उपखंड जसजसा वाढत गेला तसतसा उद्योगाचा चेहरामोहरा बदलून टाकणारे दिग्गज म्हणून टाटा कायम स्मरणात राहतील.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. राज्यातील सर्व मनोरंजन कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे.


हेही वाचा


[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *