ठाणे : नातवाने केली आजीची निर्घृण हत्या

[ad_1]

पेन्शनचे पैसे चोरल्याचा संशय घेतल्या कारणाने 21 वर्षीय नातवाने आपल्या 77 वर्षीय आजीची (grandmother) निर्घृण हत्या (grandson murder) केली.

अभि चौहान असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात अभिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

ठाण्यातील (thane) वागळे इस्टेट येथील साठे नगर परिसरात दयावती चौहान (77) या चाळीत राहत होत्या. अभि चौहान त्याच्या आई आणि बहिणीसोबत वरच्या मजल्यावर राहतो.

दयावतीचे पती सैन्यात होते. त्यांच्या मृत्यूनंतर दयावतीला त्यांच्या पेन्शनचे 12 हजार रुपये मिळत होते. काही दिवसांपूर्वी तिने पेन्शनचे पैसे आणले होते. मात्र ते पैसा अचानक गायब झाल्यामुळे दयावती अभिला वारंवार शिवीगाळ करत असे.

बुधवारी दुपारी एकच्या सुमारास अभि हा दयावतीच्या घरी गेला. त्यांनी घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर त्याने आजीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

परिसरातील नागरिक आणि अभिचे कुटुंबीय आजीला मारहाण करू नको, अशी विनवणी करत होते. पण अभि कोणाचेच ऐकत नव्हता. शेवटी त्याने घरातील मुसळ घेऊन दयावतीला ठेचून मारले. मग तो दरवाजा उघडून बाहेर गेला.

स्थानिक नागरिकांनी श्रीनगर पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अभिला ताब्यात घेतले. दयावतीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. याप्रकरणी गुरुवारी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *