[ad_1]
मुंबई, 26 जुलै : सतत धावणारं शहर अशी मुंबईची जगाची ओळख आहे. रोजच्या धावपळीत, जगण्यासाठी संघर्ष करण्यात मुंबईकरांचा बराच वेळ जातो. त्यामुळे अन्य काही करण्याची इच्छा मरुन जाते, अशी तक्रार अनेकजण करतात. सतत धावणाऱ्या
मुंबईमध्ये
काही जण निस्वार्थपणे इतरांच्या मदतीला धावून जातात. मुरारी पांचाळ उर्फ भाऊ हे 85 वर्षांचे आजोबा हे या दूर्मीळ व्यक्तींपैकी एक आहेत. 30 वर्षांपासून सेवा भाऊ हे दादरमध्ये राहतात. एका मिलमध्ये फिटर म्हणून 35 वर्ष काम केल्यानंतर त्यांनी 1993 साली स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय घेतला. निवृत्तीनंतर घरी शांत बसणे त्यांना मान्य नव्हते. एकादा गावी जाण्यासाठी त्यांना एसटीचं तिकीट काढायचं होतं. त्यावेळी मुंबई सेंट्रल स्टेशनवर त्यांना रात्रभर उभं राहावं लागलं. या घटनेनंतर त्यांचं आयुष्य बदललं. एसटी प्रवाशांना मार्गदर्शन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. गेल्या 30 वर्षांपासून ते हे व्रत करत आहेत.
News18लोकमत
सकाळी साडेसहा ते दहा आणि संध्याकाळी पाच ते सात या कालावधीत एसटी स्टँडवर जाऊन ते प्रवाशांना मार्गदर्शन करतात. लहान मुलं सोबत असलेली तरुण जोडपी ते ज्येष्ठ नागरिक सर्वच वयोगटातल्या प्रवाशांच्या मनातील सर्व शंका भाऊ दूर करतात. एकट्यानं प्रवास करणाऱ्यांना गाडीत बसवण्याचं कामही ते करतात. दादर स्टेशनहून पुणे, सातारा तसंच अन्य भागासाठी गाड्या धावतात. एशियाड थांबायला लागूनच असलेल्या स्टॉपवरुन अनेक एसटी सुटतात. या स्टॉपवर प्रवाशांची संख्या मोठी आहे, पण त्यांना बसण्याची सोय नाही. प्रशासनानं ही सोय तातडीनं करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय. या ठिकाणी बसण्याची सोय नाही. त्यामुळे प्रवाशांची बसण्याची अडचण होत आहे प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यायला हवी अशी आशा मुरारी पांचाळ व्यक्त करतात.
मुंबईच्या पावसात कधी खाल्लाय का चीज वडापाव? 2 मैत्रिणींनी सुरू केला M.A. वडापाव
सेवानिवृत्तीनंतरही प्रवाशांची सेवा करणाऱ्या मुरारी पांचाळ उर्फ भाऊ यांचं सगळ्या स्तरावर कौतुक होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांपासून सर्वसामान्य नागरिक आता भाऊंना ओळखायला लागले आहेत. त्यांच्यामुळे आपला प्रवास सुखाचा होतो अशी भावना या प्रवाशांनी बोलून दाखवलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link