MSRTC कर्मचाऱ्यांसाठी पहिले वातानुकूलित विश्रामगृह

[ad_1]

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (msrtc) कर्मचाऱ्यांसाठी मुंबई सेंट्रल (mumbai central) येथे पहिल्या वातानुकूलित विश्रामगृहाचे (AC rest house) उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. चालक आणि वाहकांना याचा खास फायदा होईल.  

या कार्यक्रमाला पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह एमएसआरटीसीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हे विश्रामगृह अंदाजे  90 लाख रुपये खर्चून बांधले आहे. तसेच हे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे विश्रामगृह विकसित केले आहे.

या उपक्रमानंतर परळ, कुर्ला (नेहरू नगर) आणि बोरिवली (नॅन्सी कॉलनी) येथील बस डेपोसाठीही अशीच वातानुकूलित विश्रामगृहे उभारण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, ठाण्यातील कोपर बस स्थानकावरही विश्रामगृह बांधण्यात येणार आहे. ज्याचे लवकरच उद्घाटन होणे अपेक्षित आहे.

एका MSRTCच्या (maharashtra state road transport corporation) अधिकाऱ्याने सांगितले की, या सुविधेमध्ये मुंबई सेंट्रल बस डेपोतील 100 कामगारांसह विविध आगारातील सुमारे 300 ड्रायव्हर आणि कंडक्टरला बसण्यासाठी तीन आधुनिक विश्रांती कक्ष आहेत.

यात डबल फ्लोर बंक बेड, एक मनोरंजन कक्ष, एक डायनिंग हॉल आणि सुसज्ज वॉशरूमचा समावेश आहे.


हेही वाचा

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *