[ad_1]
मुंबई, 25 जुलै : दोन दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाच्या सीन्नर टोल नाक्यावर मनसे नेते अमित ठाकरे यांचा ताफा काही काळ थांबवण्यात आल्यानं मनसे कार्यकर्त्यांकडून टोल नाक्याची तोडफोड करत जोरदार राडा करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणात समृद्धी टोल प्रशासनानं दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. आता यावरून ट्विट करत महाराष्ट्र भाजपनं मनसे आणि अमित ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. भाजपचा निशाणा भाजपकडून ट्विटरवर एक दोन मिनीट, वीस सेंकदांचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ‘अमीत ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा’. असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. अमित ठाकरे यांना दहा मिनीटं नाही तर साडेतीन मिनिटं टोल नाक्यावर थांबवण्यात आल्याचा दावाही या व्हिडीओमधून करण्यात आला आहे. हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे, त्यामुळे कोणा एका नेत्यासाठी इथे वेगळे नियम पाळले जाणार नाहीत, असं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
अमीत ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा.#Tollnaka #BJPMaharashtra #BJPGovt pic.twitter.com/BBRfDT9rlP
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) July 24, 2023
अमित ठाकरेंची प्रतिक्रिया अमित ठाकरे यांचा ताफा टोल नाक्यावर थांबवला, तसेच तिथल्या कर्मचाऱ्यांनी भाषा उद्धट होती असा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांकडून टोल नाक्याची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणावर अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. मला नाशिकला गेल्यावर समजलं कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर तोडफोड केली. कर्मचाऱ्यांनी फास्ट टॅग असूनही ताफा थांबवला, अधिकाऱ्यांची भाषा उद्धट होती. राज ठाकरे यांच्यामुळे अनेक टोल नाके बंद पडले, त्यात आता माझ्यामुळे आणखी एका टोल नाक्याची भर पडली अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी या प्रकरणावर दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link