[ad_1]
मुंबई, 25 जुलै, विनय दुबे : काही दिवसांपूर्वीच रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेत मोठ्याप्रमाणात जीवितहानी झाली. अनेक संसार उद्धवस्त झाले. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली आहे. मुंबईतील अंधेरी पूर्वमध्ये चार ते पाच फ्लॅटवर दरड कोसळली. ही घटना अंधेरी पूर्वमधील चकाला परिसरातील रामबाग सोसायटीममध्ये घडली आहे. सुदैवानं या दरड दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अंधेरी पूर्वमधील चकाला परिसरात असलेल्या रामबाग सोसायटीमधील काही फ्लॅटवर डोंगराचा ढिगारा कोसळला आहे. ही घटना मध्यरात्री दोन वाजता घडली. जेव्हा ही घटना घडली तेव्हा सर्व नागरिक झोपेत होते, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र घरांचं मोठं नुकसान झालं आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल शेजारीच असलेल्या डोंगराची माती या इमारतीवर कोसळत असल्यानं या इमारतीमध्ये राहाणाऱ्या 165 कुटुंबांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान दरड दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले, सध्या लोकांना सुरक्षित घराबाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link