[ad_1]
अजित मांढरे, प्रतिनिधी मुंबई, 24 जुलै : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताचा महान क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर याचं कौतुक केलं आहे. सेलिब्रिटी करत असलेल्या जाहिरातींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला असता फडणवीस यांनी सचिनचं उदाहरण दिलं आहे. सेलिब्रिटी विविध उत्पादनाची जाहिराती करतात, यात मद्य असेल किंवा गुटखा असेल. या उत्पादनाच्या जाहिराती अनेक आघाडीचे सेलिब्रेटी करताना दिसतात यावर अनेक वेळा सोशल मीडियावर टीका देखील करण्यात आली आहे, मात्र हाच मुद्दा आज पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेमध्ये चांगलाच गाजला. ऑनलाइन रमी बाबत विधी पक्षातील आमदारांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. अशा पद्धतीच्या ऑनलाईन रमीवर बंदी आणू शकता का? किंवा यांना प्रतिबंध करण्याकरता काही नियमावली आहे का? याचबरोबर गुटखा असेल किंवा अशा ऑनलाइन गेमिंगच्या जाहिराती करणारे सेलिब्रिटी असतील, ज्यांच्यावर देखील काही प्रतिबंध करता येईल का? असा प्रश्न विरोधी आमदारांकडून विधान परिषदेत उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला गेला. यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलानुसारच ऑनलाईन रमी सुरू असून एका विशिष्ट रकमेपर्यंतच ऑनलाइन गेमिंग खेळता येऊ शकतं, मात्र त्यांना अशा गेमिंगचे व्यसन लागले आहे ते विविध पद्धतीने ऑनलाइन गेम खेळतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘समझने वाले को…’, मुख्यमंत्री बदलांच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांकडून फूलस्टॉप!
जर सर्वांनीच एकदा ठरवायला हवे की अशा गेमिंग वर बंदी आणायची असेल तर, त्यावर चर्चा झाली पाहिजे आणि त्याविषयी ठोस निर्णय घेतले पाहिजे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं. सेलिब्रिटी हे जनतेचे आदर्श असतात असं असताना त्यांनी अशा पद्धतीने व्यसनांची आणि ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करणं दुर्दैवी आहे, अशी नाराजी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
News18लोकमत
फडणवीसांनी भारतरत्न सचिन तेंडुलकरचं उदाहरण देत देशातील नव्हे तर जगातील सचिन तेंडुलकर ही एकमेव अशी व्यक्ती आहे, एकमेव अशी सेलिब्रिटी आहे, ज्यांनी कधीच कोणत्याही व्यसनाधीन उत्पादनाची किंवा अशा पद्धतीच्या ऑनलाईन गेमिंगची जाहिरात केली नाही, ज्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होईल किंवा त्यांना आर्थिक नुकसान होईल. सचिन तेंडुलकर सारख्या महान व्यक्तींना याच कारणामुळे भारतरत्न दिले गेले आहे. सचिन तेंडुलकरचा आदर्श इतर सेलिब्रिटींनी देखील घ्यावा, असं फडणवीस म्हणाले.
…अन् अजितदादा आपल्याच तीन आमदारांवर भडकले, मुख्यमंत्र्यांसमोरच झापलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
[ad_2]
Source link