[ad_1]
बब्बू शेख, चांदवड, 24 जुलै : एसटीची वाट बघत असलेल्या प्रवाशांना डंपरने धडक दिली. सुदैवाने डंपर आपल्या दिशेने येत असल्याचं लक्षात येताच प्रवाशी बाजूला झाले म्हणून सर्व जण बचावले. दोघांना डंपरची धडक बसली, यात त्यांना किरकोळ दुखापत झाली. रस्त्यालगत असलेल्या हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडच्या उमराने इथं हा प्रकार घडला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय चांदवडच्या उमराने इथं प्रवाशांना आला. मुंबई-आग्रा महामार्गांवर एक भरधाव वेगाने जाणारा डंपर अनियंत्रित झाला. त्यानंतर डंपर दुभाजक तोडून एसटीची वाट बघत असलेल्या प्रवाशांच्या दिशेने आला. तेव्हा डंपर समोरून येत असल्याचं दिसताच प्रवाशांच्या धांदल उडाली. यावेळी इतर प्रवाशांनी बाजूला उड्या मारत आणि धाव घेत आपला जीव वाचवला. तर दोन प्रवासी डंपरला धडकले. त्यांना किरकोळ मार लागला आहे.
एसटीची वाट पाहत होते प्रवासी, भरधाव डंपर समोरून आला अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO pic.twitter.com/h5xqP9pD01
— News18Lokmat (@News18lokmat) July 24, 2023
देशाची काळजी घ्या, चांगलं वागा, वाचलो तर भेटू; हर्षवर्धन जाधव यांचा Video आला समोर
डंपर आपल्या दिशेने येत असल्याचं पाहून प्रवाशांनी प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. यात जर प्रवाशांचे लक्ष नसते तर मोठी दुर्घटना घडली असती. प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून त्यांचा जीव थोडक्यात वाचला. अंगावर शहारे आणणारी ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :
[ad_2]
Source link