प्रायोगिक तत्त्वावर लोणावळा स्थानकांवर ‘या’ गाड्यांना अतिरिक्त थांबा

[ad_1]

मध्य रेल्वे (central railway) ने प्रायोगिक तत्त्वावर लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – एमजीआर चेन्नई (Chennai) आणि सीएसएमटी (CSMT) – होस्पेट (Hosapete) गाडीसाठी लोणावळा स्टेशनवर 2 मिनिटांचा थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

खालील तपशीलानुसार:

12163 लोकमान्य टिळक टर्मिनस – एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला लोणावळा येथे प्रायोगिक तत्त्वावर थांबा दिला आहे. या गाडीचे लोणावळा स्थानकात 20:56 वाजता आगमन होईल आणि 20:58 वाजता प्रस्थान होईल.

12164 एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसने लोणावळा येथे प्रायोगिक तत्त्वावर थांबा दिला आहे. या गाडीचे लोणावळा स्थानकात 12.40 वाजता आगमन होईल आणि 12.42 वाजता प्रस्थान होईल.

11139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – होस्पेट – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसने लोणावळा येथे प्रायोगिक तत्त्वावर थांबा दिला आहे. या गाडीचे लोणावळा स्थानकात 23.51 वाजता आगमन होईल आणि 23.53 वाजता प्रस्थान होईल.

11140 होसापेटे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – होस्पेट यांनी लोणावळा येथे प्रायोगिक तत्त्वावर थांबा दिला आहे. या गाडीचे लोणावळा स्थानकात 02.05 वाजता आगमन होईल आणि 02.07 वाजता प्रस्थान होईल.

या गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी अथवा अधिक माहितीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देऊ शकता किंवा NTES ॲप पाहू शकता. प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी आणि सुविधेचा लाभ घ्यावा ही विनंती.


हेही वाचा

आई-वडिलांसमोरच मनसे कार्यकर्त्याची हत्या, एकाला अटक

MSRTC कर्मचाऱ्यांसाठी पहिले वातानुकूलित विश्रामगृह

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *