[ad_1]
मुंबई, 23 जुलै, विवेक गुप्ता : राज्यात पावसाची संततधार सुरू आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नौदल, हवाई दल आणि लष्कर अलर्ट मोडवर आहे. रायगडमध्ये मदतीसाठी हेलिकॉप्टर पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र खराब हवामानामुळे अडथळा निर्माण झाला आहे. दुसरीकडे यवतमाळमध्ये पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहेत. विदर्भात पावसाचा हाहाकार विदर्भात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अमरावती, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यात नद्यांना आलेल्या पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. उभं पीक पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हातबल झाले आहेत. पुराचं पाणी गावात शिरल्यानं अनेक गावातील रस्ते वाहून गेले आहेत. घरांची देखील मोठी पडझड झाली आहे. संसार उपयोगी साहित्य पावसाच्या पाण्यात भीजलं आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
Amravati News : अमरावतीमध्ये पावसाचा हाहाकार; पुराचं पाणी गावांमध्ये शिरलं, तिघांचा मृत्यू
हवामान विभागाचा अंदाज दरम्यान आज राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, ठाणे, पालघर, सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मुंबईमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. विदर्भात देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
[ad_2]
Source link