[ad_1]
मुंबई, 22 जुलै : पाऊस सुरू होताच काही लोकांना कविता सुचतात. तर काहींना सुंदर असं निसर्ग चित्र काढण्याचं मन करतं. काहींना खमंग असे पदार्थ खाण्याचे वेध लागतात तर काहींना समुद्रकिनारी फिरत आपल्या पार्टनरसोबत मस्तपैकी रोमँटिक अशी गाणी गाण्याची इच्छा होते. याच पार्श्वभूमीवर एका वृद्ध कपलच्या व्हिडीओनं इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. कारण या कपलनं ‘रिमझिम गिरे सावन’ या लोकप्रिय गाण्याचे सीन चक्क रिक्रिएट केले आहेत. कोणी केलं गाणं रिक्रिएट? ठाण्यात राहणारे शैलेश इनामदार आणि त्यांची पत्नी वंदना इनामदार यांनी अमिताभ आणि मौसमीचं हे गाणं रिक्रिएट केलं आहे. ‘रिमझिम गिरे सावन’ या सेम टू सेम असेच सीन्स या जोडप्याने शूट केले आहेत. हा सगला व्हिडीओ मुंबईतल्या वेगवेगळ्या पण त्याच ठिकाणी जिथे हे गाणं शूट करण्यात आलं होतं तिथे शूट केलं गेलंय. त्यांचे हावभाव, कपडे अगदी तसेच आहेत. या जोडप्याने खूप सुंदर अभिनय केलाय. इनामदार जोडप्यानं त्यांचे मित्र अनुप आणि अंकिता रिंगणगावकर यांच्यासोबत या गाण्याचे स्क्रीन-बाय-स्क्रीन रिक्रिएशन चित्रित केले आहे.
News18लोकमत
कशी सुचली संकल्पना? शैलेश इनामदार सांगतात की, ही संकल्पना मनातच होती ‘रिमझिम गिरे सावन’ हे गाणं मनाशी निगडित होतं. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हे गाणं माझ्याच नाहीतर लाखों लोकांच्या मनात येते. आमच्या वयाच्या ग्रुपमधील लोकांना हे गाणे खूप मनापासून आवडत. म्हणून हे गाणं आपण तसंच शूट करायचं. त्या गाण्यामध्ये अमिताभ आणि मौसमी यांनी जे कपडे घातलेले आहेत तसेच कपडे घालून गाणं शूट करायचं. असं मी वंदना हिला कळवलं पण तिने दोन वर्ष नकार दिला. पण दोन तीन महिन्यापूर्वी आम्ही मित्र मित्र भेटलो. माझा पुण्याचा मित्र अनुप याने सांगितलं तुम्ही या गाण्यासाठी मॅच होता. तुझी अमिताभ सारखी उंची आहे. वंदनाची उंची मौसमी सारखी आहे त्यानंतर त्याने सांगितले या मान्सूनमध्ये तुझे गाणे शूट होईल. मुंबईत असल्यामुळे ‘रिमझिम गिरे सावन’ शूट झालेले लोकेशन मला माहिती होते आणि आम्ही हे गाणं शूट केले,असं शैलेश इनामदार सांगतात.
लेकीला करायचंय साइंटिस्ट पण 12 वी सुद्धा पास नाही आलिया; कितवी शिकलाय रणबीर?
पुढचा प्लॅन काय? आम्हाला सोशल मीडिया किंवा ‘व्हायरल’ होण्याचा अर्थ काय हे माहीत नव्हतं. याला मिळालेला प्रतिसाद आश्चर्यकारक आहे. हे सर्व स्वप्नवत आणि हृदयस्पर्शी आहे. आमचं रिक्रिएशन तरुणांना आवडलं याचा विशेष आनंद आहे. तसेच येत्या काळात रेखा आणि अमिताभचा “ये कहाँ आ गाये हम” हे गाणं बकेट लिस्टमध्ये असून पुढच्या वेळेस रिक्रिएट करणार असल्याचं शैलेश इनामदार सांगतात. आज प्रेक्षकांकडून मिळणार प्रेम शब्दांत व्यक्त न करता येणारं आहे. हा आमचा छोटासा प्रयोग अभिताभ बच्चन यांच्यापर्यंत पोहोचावा, अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली.
आपल्या सेक्रेटरी फरजानासोबत नवरा बायको सारखं राहते रेखा? अभिनेत्रीच्या चरित्रात मोठं गुपित उघड
दोन वर्षांपासून शैलेश यांच्या मनात हे गाणं शूट करायचा विचार होता. त्यांच्या मित्राला ही आयडिया खूपच छान वाटली. त्यानंतर आम्ही हे गाणं शूट केलं आणि युट्युबवर टाकलं, असं वंदना इनामदार यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
[ad_2]
Source link