Realiance Jio Q1 – 12 टक्क्यांनी वाढला जिओचा नफा, रेव्हेन्यू 24,040 कोटींवर

[ad_1]

मुंबई, 21 जुलै :  रिलायन्स इंडस्ट्रीजची दूरसंचार कंपनी जिओ इन्फोकॉमने आज त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले. जून तिमाहीत Jio चा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 12.17 टक्क्यांनी वाढून 4,863 कोटी रुपये झाला आहे. तिमाही आधारावर कंपनीच्या नफ्यात 3.11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून तिमाहीत
रिलायन्स
जिओचे व्यवसाय उत्पन्न 24,042 कोटी रुपये होते. जून तिमाहीत वार्षिक आधारावर कमाईत 9.91 टक्के आणि तिमाही आधारावर 2.76 टक्के वाढ झाली आहे. मार्च तिमाहीत कंपनीचा व्यवसायातून महसूल 23,394 कोटी रुपये होता. Jio Infocomm चा ऑपरेटिंग नफा (EBITDA) जून तिमाहीत 12,278 कोटी रुपये होता, जो मागील तिमाहीत रु. 12,210 कोटीच्या ऑपरेटिंग नफ्यापेक्षा 0.55 टक्के जास्त आहे. जून तिमाहीत कंपनीचा EBITDA मार्जिन 52.3 टक्क्यांवर स्थिर राहिला. कर्ज-इक्विटी गुणोत्तर एका वर्षापूर्वीच्या 0.16 पटाच्या तुलनेत 0.21 पट आहे. ऑपरेटिंग मार्जिन 26.2 टक्क्यांवर स्थिर  राहिलं, तर निव्वळ नफ्याचे मार्जिन 0.30 टक्क्यांनी वाढून 17.2 टक्के झालं.
Tech tips : चुकूनही 100 टक्के चार्ज करू नका तुमचा फोन, पाहा काय होऊ शकतं नुकसान
रिलायन्स जिओची लीडरशीप जून तिमाहीतही कायम आहे. या तिमाहीत जिओने 92 लाख निव्वळ ग्राहक जोडले. 30 जून 2023 पर्यंत जिओचा ग्राहक 44 कोटी 85 लाखांवर पोहोचले होते. डेटा वापर दर महिन्याला प्रति व्यक्ती 25GB इतका होता. जिओचा त्रैमासिक डेटा ट्रॅफिक वर्षानुवर्षे 28.3 टक्क्यांनी वाढून 33.2 अब्ज जीबी झाला आहे. व्हॉइस ट्रॅफिक 7.2 टक्क्यांनी वाढून 1.34 ट्रिलियन मिनिटं झाला. जिओचा ARPU म्हणजेच प्रति ग्राहक सरासरी महसूल वार्षिक आधारावर 2.8% ने वाढून 180.5 रुपये झाला आहे. हे वायरलाइन व्यवसायाच्या चांगल्या ऑपरेशनमुळे आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे ​​अध्यक्ष आकाश एम अंबानी यांनी डिसेंबरपूर्वी पॅन-इंडिया 5G सेवेचे त्रैमासिक निकाल जाहीर केल्यानंतर सांगितले, “जिओ वेगाने त्याचे खरे 5G नेटवर्क आणत आहे. जिओ डिसेंबर 2023 पूर्वी संपूर्ण भारतातील 5G ​​रोलआउट पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. 2G मुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि प्रत्येक भारतीयाला इंटरनेट उपलब्ध करून देण्यासाठी  जिओने जिओ भारत फोन लॉन्च केला आहे. या नवीन गुंतवणुकीसह, जिओ पुढील काही वर्षांत कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील वाढीचा वेग वाढवेल.
आठवड्यातले 5 दिवसच सुरू राहणार बँक, शनिवारी गेलात तर होईल नुकसान
(डिस्क्लेमर – नेटवर्क18 आणि TV18 कंपन्या चॅनल/वेबसाइट चालवतात, ज्याचे नियंत्रण स्वतंत्र मीडिया ट्रस्टद्वारे केले जाते, ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेव लाभार्थी आहे.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *