[ad_1]
मुंबई, 20 जुलै : बुधवारी रात्रीपासून कोसळत असलेला पाऊस गुरूवारीही कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे, त्यामुळे मुंबईकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी केलं आहे. 20 जुलैला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसाचा जोर बघता मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. ‘मुंबईमध्ये जोरात पाऊस असून अतिवृष्टी होऊनसुद्धा कुठेही पाणी साचलं नाही. ही समाधानकारक बाब आहे. सकाळपासून सर्व वॉर्ड ऑफिसर आणि संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरली आहे. जिथे पाणी साचतं तिकडे जाऊन यंत्रणा ते क्लिअर करत आहे. गुरूवारीही मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट आहे, अतिमुसळधार पावसाचा इशारा असल्यामुळे सगळ्या शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. अत्यंत महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नये, जेणेकरून त्यांची गैरसोय होऊ नये. गुरूवारीही आपली संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर असून लोकांची गैरसोय कशी कमी करता येईल, यावर आमचं लक्ष राहील,’ असं इक्बालसिंग चहल म्हणाले आहेत.
News18लोकमत
बुधवारी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) लोणावळा- 204 लवासा- 77.5 पोलादपूर- 224.5 महाबळेश्वर- 196 दापोली- 255.5 सावर्डे- 140.5 चिपळूण- 152 मुरूड- 92.5 भायखळा- 119.5 चेंबूर- 125 भायंदर- 137 दहिसर- 118.5 यवतमाळ- 84
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
[ad_2]
Source link