मुंबई, 18 जुलै, अजित मांढरे : मोठी बातमी समोर येत आहे. मलाही अनेकदा भाजपनं ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. ते विधान परिषदेमध्ये बोलत होते. ते भाजप आमदार भाई गिरकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते. आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दुसरा दिवस अपेक्षेप्रमाणे वादळी ठरत आहे. अलिबाग येथील हॅास्पिटलबाबत शेकाप आमदार जयंत पाटील यांनी प्रश्न विचारला होता, त्यावर चर्चा सुरु होती, या प्रश्नावरून वारंवार जयंत पाटील सरकारला धारेवर धरत होते. चर्चा सुरू असताना भाजप आमदार भाई गिरकर यांनी मध्येच जयंत पाटील तुम्ही सरकारचे मित्र राहिलेले आहात असं म्हटलं, यावर उत्तर देताना जयंत पाटील यांनी मोठा दावा केला आहे.
News18लोकमत
नेमकं काय म्हणाले जयंत पाटील? मी नेहमी तटस्थ असतो नेहमी इथेच बसतो. मला अनेकदा ॲाफर देण्यात आलीये. चंद्रकांत पाटील इथेच बसलेत त्यांना विचारा, मला पुढच्या रांगेत बसण्याकरता किती वेळा ॲाफर दिली पण मी ती स्विकारली नाही, कारण आजच्या राजकारणात तटस्थ राहणारे काही असतात त्यापैकी मी एक असल्याचं शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :