- Marathi News
- National
- BJP In Its Effort To Unify The Vote On One Party one Election, Simultaneous Elections From Taluka To National Level
सुजित ठाकूर | नवी दिल्ली16 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षात संघटनात्मक निवडणूक एकाच वेळी करण्यावर सहमती होत आहे. तेस झाल्यास तालुक्यापासून राष्ट्रीय अध्यक्षापर्यंतची निवडणूक एका निश्चित अवधीत होऊ शकेल. यामुळे सर्व राज्यांत संघटनात्मक कामात एकरूपता शक्य होईल. गेल्या तीन दिवसांत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची संघटनात्मक निवडणूक, राष्ट्रीय मुद्दे आणि केंद्र सरकारची धोरणे पुढे नेण्यावर चर्चा झाली. भाजपमध्ये सध्या २६ राज्यांतील संघटनात्मक निवडणूक प्रलंबित आहे. कमीत कमी निम्म्या म्हणजे १८ राज्यांतील निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षाचा निवडणूक जाहीर होते. सूत्रांनुसार, सर्व प्रदेश शाखांना सांगितले की, एका आठवड्याच्या आत उर्वरित २६ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून प्रदेशाध्यक्षाचे नाव जाहीर करावे. अडचण आल्यास ती पुढील महिन्यांत पूर्ण केली जावी.
एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, एक देश एक निवडणुकीच्या धर्तीवर संघटनेत एकाच वेळी निवडणुकीचा सैद्धांतिक निर्णय घेतला आहे. काही राज्यांत पाच वर्षांपासून एकच व्यक्ती अध्यक्ष आहे. यामुळे संभ्रमावस्था होत आहे. सर्व प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळ एका वेळी सुरू झाल्यास तीन वर्षांपर्यंत त्यांच्याकडे संघटनेचे काम करण्याची संधी असेल. प्रदेशाध्यक्ष निवडणूक झाल्याच्या सात दिवसांच्या आत राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली जाईल. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवीन राष्ट्रीय अध्यक्षांना सर्व प्रदेशांच्या पूर्णकालीक अध्यक्ष व त्यांची टीम बनवावी लागेल.यामुळे कामात समग्रता येईल.
अध्यक्ष कार्यकाळ ५ वर्षे करण्याची शिफारस
सूत्रांनुसार, तीन दिवसीय बैठकीत झालेल्या चर्चेत संघटनेत विविध स्तरावरील अध्यक्षांचा कार्यकाळ वाढवणे योग्य ठरेल. अध्यक्षाचा कार्यकाळ ३ वरून वाढून ५ वर्षे केला जावा,अशी शिफारस आहे. यासोबत त्याचा ताळमेळ लोकसभा निवडणुकीनुसार असावा. भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्षासह सर्व अध्यक्षांचा कार्यकाळ तीन वर्षांचा आहे. तो त्वरीत आणखी एका अवधीसाठी(तीन वर्षे) अध्यक्ष होऊ शकतो. यामुळे अडचण अशी येते की, लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रीय आणि अनेक प्रदेशांच्या अध्यक्षांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे आणि त्याला विस्तार द्यावा लागतो. यामुळे संभ्रमावस्था तयार होते की, कार्यकाळ वाढवला नाही किंवा वाढला तरी तो काही महिन्यांत नवीन अध्यक्ष होईल आणि आपली टीम तयार करेल.
५०० तरुण भाजपच्या टीममध्ये सहभागी होतील
भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, ज्यांची राजकीय पार्श्वभूमी नाही अशा सव्वा लाख अशा तरुणांना राजकारणात आणण्याचे सुतोवाच पंतप्रधान मोदींनी केले आहे. गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर किमान २ अशा युवा टीमचा समावेश करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. ५०० तरुणाईला भाजपमध्ये स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. यात महिला – पुरुष दोघे असतील.