काय आहे इन्स्टाग्रामचं ब्लेंड? क्रशला इम्प्रेस करायला कसा होतोय वापर? जाणून घ्या A टू Z तपशील!


Instagram Blend feature: सध्याची तरुण पिढी फेसबुकवरुन इन्स्टाग्रामकडे मोठ्या प्रमाणात वळली आहे. फोटो, स्टोरी अपलोड करणे, रिल्स बनवणे, पाहणे यात अनेकजण खूप वेळ घालवत असतात. इन्स्टाग्रामदेखील आपल्या यूजर्ससाठी दरवेळेस नवे अपडेट घेऊन येत असते. यावेळेस इन्स्टाग्रामने ब्लेड फिचर आणलंय. ज्याचा युजर्सना खूप फायदा होतोय. काय आहे हे फिचर? हे कसं वापरायचं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

इंस्टाग्रामने अलीकडेच ब्लेंड नावाचे एक नवीन फीचर लाँच केले आहे. या फिचरच्या मदतीने आता तुम्ही आणि तुमचे मित्र एकत्रितपणे पर्सनल रील्स फीड पाहू शकता. हे फिचर वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या इन्स्टाग्राम फ्रेण्डला निमंत्रण पाठवावे लागणार आहे. तुमचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर या फिचरचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे. ब्लेंड इनस्टाग्राम यूजर्समधील संवाद अधिक मजेदार बनवणे आणि टिकटॉक सारख्या प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करणे हा या फिचरमागचा उद्देश आहे. 

मजेदार अनुभव 

ब्लेंड फीचरद्वारे इंस्टाग्राम आता एक असा प्लॅटफॉर्म तयार करतंय जिथे तुम्ही आणि तुमचे मित्र तुमच्या दोघांनाही आवडणारे रील एकत्र पाहू शकता. यामुळे एक मजेदार अनुभव मिळेल. कारण तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या मित्रांच्या आवडीनुसार तयार केलेल्या नवीन आणि ताज्या रील्स तुम्हाला दररोज फीडमध्ये दिसणार आहेत. 

ब्लेंड कसं वापरायचं?

जर तुम्हाला ब्लेंड फीचरचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला खासगी किंवा ग्रुप चॅट उघडावे लागेल. तिथे तुम्हाला वरच्या बाजूला Blend आयकॉन दिसेल. त्यावर टॅप करा आणि “Invite” पर्याय निवडा. ज्या मित्रांसोबत तुम्हाला Blend तयार करायचे आहे त्यांना आमंत्रित करा. एकदा मित्राने आमंत्रण स्वीकारले की ब्लेंड सक्रिय होईल. तुम्हाला कस्टम रील्स फीड मिळण्यास सुरुवात होईल.यानंतर तुमच्या मित्राने रीलवर कमेंट केली तरी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. यातून तुम्हाला एकाच रीलवर संभाषण सुरू करण्यास आणि मजेदार संभाषण सुरु करता येईल. तुमच्या DM मध्ये जाऊन आणि Blend आयकॉनवर टॅप करून तुम्ही ते फीड पुन्हा पाहू शकता.

नाही आवडलं तर…

जर तुम्हाला हे फिचर  आवडले नाही तर तुम्ही ते सहजपणे रद्द करू शकता. ब्लेंड सोडण्यासाठी इंस्टाग्राम अॅप उघडा नंतर मेसेज किंवा पेपरप्लेन आयकॉनवर टॅप करा. ज्या चॅटमध्ये Blend आहे ते उघडा आणि वरच्या उजव्या कोपऱ्यातील Blend आयकॉनवर टॅप करा. नंतर तीन-बिंदू मेनूवर जा आणि “Leave this Blend” पर्याय निवडा. असे केल्यानंतर तुम्ही ब्लेंडमधून बाहेर पडाल.  या फीचर युजर्सपर्यंत येण्याची वेळ देखील खास आहे. कारण मेटा म्हणजेच इंस्टाग्रामची मूळ कंपनी सध्या कायदेशीर आव्हानांना तोंड देतेय. अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्याची चर्चा आहे. टिकटॉक सध्या अमेरिकेत काम करत आहे पण त्यावर कधीही बंदी घातली जाऊ शकते. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न करत असून त्यांनी टिकटॉकला 75 दिवसांची मुदत दिली आहे.

आयपॅड यूजर्ससाठी अपडेट

इंस्टाग्राम आता आयपॅडसाठी एक खास अॅप बनवतंय. आतापर्यंत आयपॅड यूजर्सना आयफोन अॅप्स वापरावे लागायचे. जे मोठ्या स्क्रीनवर चांगले काम करत नव्हते. आता कंपनी एक नवीन अॅप तयार करतेय. पण ते कधी लॉंच होणार? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *