मुंबई, 17 जुलै, विनोद राठोड : मोठी बातमी समोर येत आहे. आज बंगळुरूमध्ये देशातील प्रमुख विरोधी पक्षांची दुसरी बैठक आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित राहणार होते. मात्र शरद पवार यांनी अचानक आपला हा दौरा रद्द केला आहे. आता शरद पवार हे विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीयेत. शरद पवार आज मुंबईमध्येच राहणार आहेत. दुसरीकडे आजच पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अजित पवार यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. पवार यांनी देखील आपला दौरा अचानक रद्द केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. काँग्रेसनं बोलावली बैठक आज बंगळुरूमध्ये विरोधकांची दुसरी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. यापूर्वी पहिली बैठक पाटणा इथे झाली होती. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व आहे. काँग्रेसच्या वतीनं ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेससोबत देशातील 24 पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र शरद पवार यांनी आपला आजचा कार्यक्रम अचानक रद्द केला आहे. शरद पवार हे आज मुंबईमध्ये राहणार आहेत. अजित पवार गटानं घेतली शरद पवारांची भेट दरम्यान दुसरीकडे रविवारी अजित पवार गटानं शरद पवार यांची भेट घेतली आहे. आम्ही शरद पवार यांचे आर्शिवाद घेण्यासाठी त्यांची भेट घेतली अशी प्रतिक्रिया या भेटीवर प्रफुल्ल पटेल यांनी दिली. या भेटीवेळी अजित पवार गटाचे सर्वच मंत्री उपस्थित होते. आजच्या अधिवेशनामध्ये व्हीपचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :