Mumbai News: मढ येथील समुद्रात वाहून गेली 5 मुलं, सकाळपासून शोधमोहिम सुरू


मुंबई 16 जुलै : मुंबईच्या मालाड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मढ येथे 5 मुलं समुद्रात वाहून गेली आहेत. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास मुंबई फायरब्रिगेडला याबाबत माहिती देण्यात आली. या मुलांना शोधण्याची मोहीम सुरू आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. महिला मुलांसमोरच लाटेसोबत वाहून गेली मुंबईतील वांद्रे येथूनही नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. यात समुद्रकिनारी फिरायला जाणं एका कुटुंबाला भलतंच महागात पडलं. मुंबईतील वांद्रे बँडस्टँडजवळ रविवारी संध्याकाळी ज्योती सोनार नावाची महिला तिच्या कुटुंबासह गेली होती. यावेळी ती समुद्राच्या लाटेत वाहून गेली. पती मुकेश आणि त्यांची तीन मुलं ही दुर्दैवी घटना पाहत होती.
Mumbai News: मुलं आई-वडिलांचा फोटो काढत असतानाच डोळ्यादेखत आई समुद्रात वाहून गेली; मुंबईतील धक्कादायक घटना
पती मुकेश या घटनेबद्दल बोलताना म्हणाला, ‘मी तिला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. जेव्हा चौथी लाट आम्हाला मागून धडकली तेव्हा माझा तोल गेला आणि आम्ही दोघेही घसरलो. मी माझ्या पत्नीची साडी पकडली आणि जवळच्या एका पर्यटकाने माझा पाय मागून पकडला, पण तिला वाचवता आलं नाही. मुकेशने सांगितलं की, त्यांचं कुटुंब दोन आठवड्यातून एकदा सहलीला जायचं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *