रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास होतोय? कंत्राटदाराला सांगा; BMCनं लावले बॅनर


मुंबई, 15 जुलै : प्रत्येक पावसाळ्यात मुंबईचा पाऊस आणि रस्त्यांवरील खड्डे यांची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दरवर्षी नागरिक बृहन्मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) धारेवर धरत असतात. या वर्षी अशी परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच बीएमसीनं एक शक्कल लढवली आहे. बीएमसीच्या वतीनं वांद्रे,खार-लिंकिंग रोड,आंबेडकर रोड, 30वा रस्ता आणि5व्या रस्त्यासह अनेक रस्त्यांवर काही बॅनर लावण्यात आले आहे. जनतेला खराब पॅच किंवा खड्ड्यांबद्दल कोणतीही तक्रार असल्यास संबंधित कंत्राटदाराला फोन करावा,असे बॅनर बीएमसीच्या एच-वेस्ट वॉर्डनं लावले आहेत. या वॉर्डमधील रस्त्यांचं कंत्राट नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड यांच्याकडे आहे.‘टाइम्स ऑफ इंडिया’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. बीएमसीच्या सहा हजार कोटी रुपयांच्या रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाचा भाग असलेल्या पाच कंत्राटदारांमध्ये नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडचा समावेश होतो. कंपनीशी संपर्क करण्याचे नंबर असलेला एक बॅनर30रोड,वांद्रे येथे लावण्यात आला आहे. बीएमसीनं स्वतःची जबाबदारी झटकू नये. सार्वजनिक रस्त्यांच्या समस्यांसाठी जनतेनं कंत्राटदारांवर अवलंबून राहावे,अशी अपेक्षाही करू नये,असं मत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलं आहे.
मुंबईत चोरीचा अजब प्रकार! चोरलेली रिक्षा गहाण ठेऊन पैसे ट्रान्सफर; पोलीसही चक्रावले
बीएमसीनं असं कृत्य करणं’बेकायदेशीर’आणि अनैतिक असल्याचं वांद्रे येथील भाजप आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, “कंत्राटदाराची नियुक्ती बीएमसीनं केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली तक्रार घेऊन खासगी कंत्राटदाराचे दरवाजे ठोठावण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. बीएमसीनं प्राथमिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. गरज पडल्यास अपुर्‍या कामासाठी कंत्राटदाराला दंड करावा.” नागरी अधिकार्‍यांनी बीएमसीचा बचाव केला आहे. जबाबदारीतून मुक्त होणं हा बीएमसीचा उद्देश नाही. उलट या बॅनरच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी अतिरिक्त माध्यम प्रदान केलं गेलं आहे. बीएमसीकडे तक्रारी आणल्या तरी,या समस्या सोडवण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला सामील करून घ्यावंच लागतं,असंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. वांद्रेचे माजी नगरसेवक आसिफ झकेरिया म्हणाले, “मुंबईचे रस्ते बांधण्यासाठी मोठ्या पायाभूत सुविधा कंपन्यांना कंत्राट देणाऱ्या बीएमसीनं प्रत्यक्षात काहीही बदल केलेला नाही. कारण,या मोठ्या कंपन्याही या रस्त्यांची देखभाल करण्यास असमर्थ ठरल्या आहेत. सरतेशेवटी याचा नागरिकांनाच त्रास सहन करावा लागत आहे.” खारमधील भाजपच्या माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे म्हणाल्या की,बीएमसी रस्त्यांची मालक आहे आणि त्यांची देखभाल करण्याची जबाबदारीदेखील पालिकेचीच आहे. दरम्यान,गेल्या वर्षीपेक्षा यंदा तक्रार यंत्रणा अधिक प्रभावी ठरली असून,खड्ड्यांसंबंधीच्या तक्रारींवर अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *