खाते वाटपावरून शिवसेना नाराज आहे का? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं


नागपूर, उदय तिमांडे : शुक्रवारी खाते वाटप जाहीर झालं. मात्र राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना महत्त्वाची खाती मिळाल्यानं शिवसेनेचे नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खातं महत्त्वाचं नाही तर त्या खात्याला किती न्याय दिला जातो हे महत्त्वाचं आहे. जे खाते मिळाले त्या खात्याचा संबंध हा राज्यातील 13 कोटी जनतेशी असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले बावनकुळे?   खातं महत्त्वाचं नाही तर त्या खात्याला किती न्याय दिला जातो हे महत्त्वाचं आहे. जे खाते मिळाले त्या खात्याचा संबंध हा राज्यातील 13 कोटी जनतेशी आहे. अस्वस्थ झालेले विरोधक आमच्यामध्ये खात्यावरून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आमची टीम चांगली आहे. आमचे तिनही पक्ष फेव्हीकॉलचा जोड आहे, त्यामुळे खात्यावरून कोणी नाराज होण्याचा प्रश्नच नसल्याची प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे.
‘अजितदादा म्हणजे कामाचा माणूस’; काय आहेत सामान्य जनतेच्या भावना? हा Video एकदा पाहाच
विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर   दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांच्या आरोपांना देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांना त्यांचे आमदार सांभाळता येत नाही, म्हणून तर आम्हाला समर्थन मिळत आहे. विधानसभेत आमच्याकडे 210 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे. विरोधीपक्ष आता 70 -78 वर आला आहे. पुढेही अशीच स्थिती त्यांना दिसत आहे. विरोधीपक्ष नेता होण्याइतपतही संख्याबळ त्यांच्याकडे राहणार नाही, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *