हिटमॅन रोहित शर्मा कितवी शिकलाय? किती संपत्तीचा मालक? जाणून घ्या सर्वकाही!

[ad_1]

Rohit Sharma Education Wealth: हिटमॅन रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेतलीय. रोहितने स्वत:च सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात घोषणा केलीय. यानंतर रोहितच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसलाय. रोहित शर्मा सध्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. रोहितकडून कॅप्टन्सी काढून हार्दीक पांड्याला दिल्यानंतर फॅन्सनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हिटमॅनच्या चाहत्यांनी हार्दीक पांड्यालाही ट्रोल करण्यास मागेपुढे पाहीलं नाही. फॅन्स रोहितला मुंबईचा राजा म्हणून संबोधतात. दरम्यान रोहित शर्मा कितवी शिकलाय? तो किती संपत्तीचा मालक आहे? 

रोहितला जगातील महान फलंदाजांपैकी एक मानले जाते. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2013 पासून सुरू असलेला आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपवला. 2024 मध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 विश्वचषक जिंकला. यानंतर रोहितने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता त्याने कसोटी सामन्यातून निवृत्ती घेतली. असे असले तरी तो एकदिवसीय सामने खेळताना दिसणार आहे.

रोहित शर्माने जून 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आयर्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. यानंतर त्याने सप्टेंबर 2007 मध्ये टी-20 मध्ये पदार्पण केले पण त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. त्याच्या दुसऱ्या सामन्यात रोहितने पहिल्या डावात षटकार मारून 50 धावा केल्या होत्या.  कसोटी सामन्यांमध्ये त्याने 67 सामने खेळले आहेत आणि 12 शतके आणि 18 अर्धशतकांसह 4301 धावा केल्या आहेत. 

273 एकदिवसीय सामने खेळताना रोहितने 11168 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 32 शतकांचा समावेश आहे. 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना हिटमनने 4231 धावा केल्या. 2024 च्या टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर रोहितने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

रोहित शर्मा किती शिकलाय?

भारतीय कर्णधार रोहित शर्माने महाविद्यालयीन शिक्षणासाठी रिझवी कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. असे असले तरी आपल्या क्रिकेटप्रेमामुळे तो पदवीदेखील पूर्ण करू शकला नाही. त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले आणि आज त्याची गणना महान क्रिकेटपटूंमध्ये केली जाते.

रोहितची एकूण संपत्ती किती?

रोहित शर्माची एकूण संपत्ती सुमारे 214 कोटी रुपये आहे. क्रिकेट व्यतिरिक्त, त्याला ब्रँड एंडोर्समेंट, आयपीएल आणि क्रिकेट सामने खेळण्यासाठी पैसे मिळतात. याशिवाय, त्याला त्याच्या दोन अपार्टमेंटमधून भाडे देखील मिळते. त्याला त्याच्या अपार्टमेंटमधून दरमहा सुमारे 3 लाख रुपये भाडे मिळते.आयपीएलमधून त्याला प्रत्येक हंगामात साधारण 16.30 कोटी रुपये मिळतात. कसोटी प्रती सामन्यासाठी तो 15 लाख रुपये घ्यायचा. एकदिवसीय प्रती सामन्यसाठी 6 लाख रुपये,  टी२० सामन्यासाठी 3 लाख रुपये आकरतो.रोहित शर्माची एकूण आयपीएल कमाई 174.3 कोटी रुपये आहे. बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट ग्रेड ए+ नुसार असून त्यानुसार त्याला 7 कोटी रुपये मिळतात. 

ब्रँड एंडोर्समेंटमधून खूप कमाई 

रोहित शर्मा जाहिरातींमधून 7 कोटी रुपयांपर्यंत कमाई करतो. तो ड्रीम-11, आदिदास, निसान, ओप्पो आणि ला लीगा सारख्या अनेक मोठ्या ब्रँडची जाहिरात करतो. रिपोर्ट्सनुसार, रोहित एका एंडोर्समेंट डीलसाठी 5 कोटी रुपये घेतो.

रोहित शर्माच कुटुंब

रोहितच्या पत्नीचे नाव रितिका सजदेह आहे.रोहित शर्माच्या पत्नीचे नाव रितिका सजदेह आहे. दोघांनीही बराच काळ एकमेकांना डेट केले. रितिका एका कंपनीत स्पोर्ट्स मॅनेजर होती. रोहितने मुंबईतील बोरिवली स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर रितिकाला गुडघ्यावर प्रपोज केले. वयाच्या 11 व्या वर्षी रोहित याच मैदानावर खेळत मोठा झाला.रोहित शर्माच्या मुलाचे नाव अहान शर्मा आहे. त्याच्या मुलीचे नाव समायरा आहे. 15 नोव्हेंबर 2024 रोजी रोहित दुसऱ्यांदा वडील झाला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *