[ad_1]
- Marathi News
- National
- Colonel Sophia Asked Her Brother After The Conversation How Did The Explosion Feel, Mission Accomplished!, One Is An Expert In Peace In A War Situation, The Other Is A ‘deadly Flying Angel’
बडोदा7 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

ऑपरेशन सिंदूरची माहिती जगाला देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका यांची कथाही रोमांचक आहे. कर्नल सोफिया यांनी पत्रकार परिषदेनंतर बडोद्यातील भावाला फोन करून सांगितले, मिशन पूर्ण झाले, धमाका कसा वाटला?
आई-वडील म्हणाले, मुलीने माता-बहिणींच्या सिंदूरचा बदला घेतला
आम्हाला अभिमान आहे, मुलीने देशासाठी मोठे काम केले. पाकिस्तानला नष्ट करायला हवे. माझे आजोबा, वडील अन् मी सैन्यात होतो. आता मुलगी सैन्यात आहे. -ताज मोहंमद कुरेशी, कर्नल सोफियाचे वडील
मुलीने बहिणी आणि मातांच्या सिंदूरचा (कुंकवाचा) बदला घेतला. सोफिया पिता आणि आजोबांच्या पावलावर चालते. सोफिया लहानपणी म्हणायची, मी सैन्यातच जाणार. -हलिमा कुरेशी, कर्नल सोफिया यांची माता
कर्नल सोफिया कुरेशी… आजोबा, वडील, पती सर्वच सैन्यात
- भूदल सिग्नल कोअरच्या वरिष्ठ अधिकारी. बहुराष्ट्रीय सैन्य सरावात भारतीय सेनेच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
- १९८१ चा जन्म असणाऱ्या सोफिया गुजरातच्या बडोदा येथील रहिवासी आहेत. त्यांनी जैवरसायनात पोस्ट ग्रॅज्युएट केले आहे. १९९९ मध्ये शाॅर्ट सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून १७ व्या वर्षी त्या सैन्यात भरती झाल्या. पती सैन्यात मेकॅनाइज्ड अधिकारी, आजोबादेखील सैन्यात होते.
- २०१६ मध्ये एक्सरसाइज फोर्स १८ मध्ये भारतीय टीमचे नेतृत्व केले आहे. भारताच्या सर्वात मोठे परराष्ट्रीय सैन्य अभियानात सामील होणाऱ्या पहिल्या महिला कमांडर ठरल्या.
- त्यांनी ६ वर्षे संयुक्त राष्ट्राच्या शांती रक्षा अभियानात (पीकेओ) सेवा दिली आहे. तसेच संयुक्त राष्ट्र मिशन कांगोमध्ये (२००६) एक महत्त्वपूर्ण कालावधी घालवला आहे.
काश्मीर, अरुणाचलमध्ये कठीण हवाई मोहिमांमध्ये कामगिरी फत्ते
- विंग कमांडर व्योमिका सिंह हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट आहेत. राष्ट्रीय कॅडेट कोअरद्वारे (एनसीसी) करिअर सुरू. त्यानंतर इंजिनिअरिंग.
- १८ डिसेंबर २०१९ ला त्यांना फ्लाइंग ब्रँचमध्ये स्थायी नियुक्ती मिळाली. आतापर्यंत २५०० तासांहून अधिक उड्डाण भरले. त्यांनी जम्मू-काश्मीर आणि पूर्वोत्तर भारतात कठीण परिस्थितीत चेतक आणि चिता यासारख्या हेलिकॉप्टरचे सारथ्य केले. एक ऑपरेशन अरुणाचल प्रदेशात नोव्हेंबर २०२० मध्ये फत्ते. आता कठीण हवाई मोहिमांमध्ये सर्वात यशस्वी महिला पायलट्सपैकी एक.
- त्यांनी २०२३ मध्ये एका खासगी वाहिनीला सांगितले की, ६ वीत असताना सर्व मित्र आपल्या नावांची चर्चा करत होते. तेव्हा मी त्यांना सांगितले की, मी पायलट होणार.
[ad_2]
Source link