‘हैवानांना मातीत गाडणेच माणुसकीच्या रक्षणाचे धर्मयुद्ध’: 140 कोटींचा उद्रेक, भारताने केले दहशतवादाचे तळ बेचिराख

[ad_1]

  • Marathi News
  • International
  • 140 Crores Outbreak, India Destroyed The Bases Of Terrorism, ‘Burying The Animals In The Ground Is A Crusade To Protect Humanity’

नवी दिल्ली41 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारताने पाक व पीओकेत दहशतवादी तळ उद्‌ध्वस्त करून जे उत्तर दिले ती लष्करी कारवाई नव्हे तर १४० कोटी भारतीयांच्या संतापाचा उद्रेक आहे. देशात जय हिंदचा जयघोष आहे. सत्ताधारी असो की विरोधक, चित्रपट की क्रीडा क्षेत्र सर्व जण लष्कराला सलामी देताहेत. हा सूड नव्हे भारताचा हुंकार आहे. जिथे दहशतीचा, शत्रूचा सर्वनाश निश्चित आहे.

  • आम्ही शब्दांनी नाही, कारवाईने उत्तर दिले. आमचा संदेश स्पष्ट आहे. दहशतीच्या व्यापाऱ्यांची गय केली जाणार नाही. पाकिस्तान याला युद्ध म्हणो की प्रत्युत्तराची कारवाई, आमची कारवाई राष्ट्रहित व स्वसंरक्षणात होती. -एस. जयशंकर, विदेशमंत्री
  • पहलगाम अतिरेकी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय लष्कराने पाकिस्तान व पीओकेत अतिरेकी तळांवर निशाणा साधला. दहशतवााविरुद्ध संपूर्ण देश एकजूट आहे. भारतीय लष्कराच्या धाडसाचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. -नितीश कुमार, मुख्यमंत्री बिहार
  • लष्कराने पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या लक्ष्यित हल्ल्याचे स्वागत. पाकिस्तानी डीप स्टेटला अशी कठोर शिकवण दिली पाहिजे की, पुन्हा दुसरा पहलगाम होऊ नये. पाकिस्तानचे दहशतवादी अड्डे नष्ट केले पाहिजेत. -असदुद्दीन ओवेसी, अध्यक्ष एआयएमआयएम
  • पाकिस्तानच्या हैवानांवर बुलडोझर चालवणे भारत व माणुसकीच्या रक्षणाचे धर्मयुद्ध आहे. जे दहशतवादी इस्लामच्या आड लपवण्याचा प्रयत्न करतात, ते इस्लाम आणि माणुसकी दोघांचे शत्रू आहेत. -मुख्तार अब्बास नक्वी, भाजप नेते
  • निर्दोष लोकांच्या मृत्यूला न्याय देण्याचा हक्क होता. हा दहशतवादाच्या छाताडावर ठोसा आहे,जो संयमाची परीक्षा घेत होता. आम्ही दुबळे नाही आणि राहणारही नाही. -शशी थरूर, काँग्रेस खासदार
  • ऑपरेशन सिंदूर, पहलगामच्या निर्दोष नागरिकांच्या हौतात्म्याचे पहिले उत्तर आहे. ही फक्त लष्करी कारवाई नाही, न्यायाची सुरुवात आहे. संपूर्ण राष्ट्र जवानांसोबत आहे. -राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
  • पहलगाममध्ये निरपराध नागरिकांची हत्या एक गंभीर चिथावणी होती. अशा स्थितीत भारताकडे दहशतवादाच्या स्रोतांविरुद्ध बळकट उत्तर देण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, यापुढे युद्धाची स्थिती होऊ नये. -भारतीय कम्युनिस्ट पार्टी
  • एकतेत निडर. शक्तीत अमर्याद. ही भारताची खरी ढाल. देश एकजूट असतो तेव्हा कोणतीही शक्ती नमवू शकत नाही. दहशतवादासाठी या जगात कोणतेही स्थान नसले पाहिजे. आपण सर्व एक टीम आहोत. -सचिन तेंडुलकर, क्रिकेटपटू
  • ऑपरेशन सिंदूर हा एक लाल इशारा आहे. पहलगाममध्ये सांडलेल्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल. -हर्ष गोयंका, चेअरमन, आरपीजी एंट.
  • भारत दहशतवादाविरुद्ध एकजूट व अढळ आहे. वीर सैन्याचे यश व सुरक्षेची प्रार्थना. -संजीव गोयंका, चेअरमन, गोयंका ग्रुप
  • योद्ध्यांची लढाई सुरू झाली आहे… मिशन पूर्ण होत नाही, तोवर युद्धबंदी नाही. संपूर्ण राष्ट्र तुमच्यासोबत आहे. -रजनीकांत, अभिनेता
  • ऑपरेशन सिंदूरसोबत आम्ही वीर जवानांना सलाम करतो. हे उत्तर दहशतवादाविरोधात न्यायाचे प्रतीक आहे.-अक्षय कुमार, अभिनेता

जय हिंद! भारत दहशतवादाविरुद्ध एकजूट असल्याचे ऑपरेशन सिंदूरने दाखवले.-अदनान सामी, गायक

ही फक्त लष्करी कारवाई नव्हे तर दहशतवादाबाबत धोरण

ही फक्त लष्करी कारवाई नव्हे तर भारताच्या धोरणाचा स्पष्ट संकेत आहे की, आम्ही दहशतवाद सहन करणार नाही. सरकार व लष्कराच्या निर्णायक पावलांना पाठिंबा. -मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

आमचा संदेश : भारतावर हल्ला केल्यास सडेतोड उत्तर मिळेल…

ऑपरेशन भारतीयांच्या हौतात्म्याचे उत्तर आहे. हा दहशतीविरोधात भारताच्या निर्णायक धोरणाचा उद‌्‌घोष आहे.भारतावर हल्ला केल्यास सडेतोड उत्तर मिळेल. -अ​मित शाह, गृहमंत्री

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *